राज्यस्तरीय तलवारबाजीत महेश तेलतुंबडे याला कांस्यपदक

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 25 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्र फोन्सिंग असोसिएशन व सातारा जिल्हा फोन्सींग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वाई येथे आयोजित केलेेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत मोहोळ येथील महेश रविंद्र तेलतुंबडे याने उल्लेखनीय कामगिरी करत कास्य पदकाची कमाई केली.

मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्र फोन्सिंग असोसिएशन व सातारा जिल्हा फोन्सींग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वाई येथे आयोजित केलेेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत मोहोळ येथील महेश रविंद्र तेलतुंबडे याने उल्लेखनीय कामगिरी करत कास्य पदकाची कमाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र फोन्सिंग असोसिएशन आणि सातारा जिल्हा फोन्सिंग असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन केले जाते. सलग दहाव्या वर्षी या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन वाई जि. सातारा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहोळ येथील महेश रविंद्र तेलतुंबडे याने उल्लेखनीय कामगिरी करुन कास्य पदकाची कमाई केली. महेश हा मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांचा महेश हा मुलगा आहे.  

महेशच्या यशाबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक एस.विरेश प्रभु, अप्पर पोलीस अधिकक्ष मिलींद मोहिते, सोलापूर ग्रामीण विभागाचे उप अधिक्षक अभयसिंह डोंगरे इत्यादी वरिष्ठ अधिकार्‍यांसह  मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनि.निलेश बडाख, सपोनि. विक्रांत बोधे, सपोनि. दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक राजु राठोड, उपनिरीक्षक विष्णु गायकवाड, उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव यांच्यासह सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी त्याचे अभिनंदन करुन भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत. पोलीस बॉयने मिळवलेल्या यशा बद्दल पोलीस प्रशासनातुन त्याचे कौतुक केले जात आहे.
 

Web Title: mahesh wins bronze in state level fencing