मलकापूरात येणार महिलाराज 

Mahilaraj will come soon in Malkapur
Mahilaraj will come soon in Malkapur

मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते. आरक्षणांमुळे पत्ता कट झालेले काही नेते अन्य प्रभागांची चाचपणीची चर्चा करत होते. पालिकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सकाळी अखरा वाजता आरक्षण सोडती झाली. निवडणुक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरवातीला समजावून सांगितली. त्यानंतर चिठ्ठीपद्धतीने आरक्षण काढण्यात आले. सहायक निवडणुक निर्णय अधिकारी उपस्थिती होत्या. आरक्षणासाठी राजकीय सर्वच गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

अनुक्रमे प्रभाग व कंसात त्याचे आरक्षण -

  • (आरक्षण - सर्वसाधरण महिला व खुला) - संगम हॉटेल, कालिदास मार्केट, नेहरूनगर, रिमांड होम परिसर, चांदे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शास्त्रीनगर परिसर, वीज लाईन, नेताजी सुभाषचंद्रनगर, वारणा हॉटेल परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तनगर परिसर, साईनगर, विशाल कॉलनी, संभाजी कॉलनी.
  • (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण खुला) - अजंठा पोल्ट्री फार्म, मळाईनगर, प्रितीसंगम मंगल कार्यालय, यशवंतनगर, मुल्ला वस्ती, गोकाक ऑफिस, तुळजाईनगर, हॉटेल नवरंग, अक्षदा मंगल कार्यालय, लक्ष्मी कॉलनी, सरस्वती कॉलनी, ज्ञानदिप कॉलनी. 
  • (नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला) - तवटे मार्केट, डीएमएस कॉम्प्लेक्स, म्हसोबा मंदिर, गणेश मंगल कार्यालय, कुसूम रेसिडेन्सी, विश्रामनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याच्या उत्तरेकडील, बिरोबा मंदिराचे पुर्वेकडील, गजानन पतसंस्था, भारती विद्यापीठ, यशवंत हौसिंग सोसायटी, श्री. गोफणे यांचे घरापर्यंतचा दक्षिण भाग, आनंदराव चव्हाण हायस्कूल. 
  • (सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला) - भोजगावकर कॉम्प्लेक्स, मळाई टॉवर, सोनाई मंगल कार्यालय, हौसाई कन्याशाळा, खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप, नटराज थेटर, लाहोटीनगर, इंदूमतीनगर, शिवाई पतसंस्था, कोणार्क पार्क, संगम कॉलनी, मामा बझारचे उत्तरेकडील, दत्त मंदीराच्या पूर्वेकडून रस्त्याच्या पूर्वे भाग 
  • (अनुसुचित जाती खुला आणि सर्वसाधारण महिला) - दत्त मंदिर, संपूर्ण बागल वस्ती, दत्त शिवम हौसिंग सोसायटी, जय मल्हार कॉलनी, न्यु सर्वोदय सोसायटी, अयोध्यानगरी, नूतन मराठी प्राथमिक शाळा, शिवदर्शन हौसिंग सोसायटी, बालाजी कॉलनी पूर्व भाग. 
  • (नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला) - बालाजी कॉलनी पश्चिम भाग, जाधव वस्ती, पोळ वस्ती, वाघमारे वस्ती, पवार वस्ती, गणेश मंदिर, रैनाक वस्ती, इंगवले वस्ती, जाधव वस्ती, गणेश कॉलनी व पूर्वेकडील संपूर्ण भाग, शिवपार्वती कॉलनी, अभिनव कॉलनी, तडक वस्ती, त्रिमूर्ती कॉलनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आगाशिवनगर शाला क्रमांक दोन, हनुमाननगर, महसूल कॉलनी.
  • (अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण खुला) - प्राथमिक आरोग्य उपकेंदाचे पश्चिमेकडील झोपडपट्टी, दांगट वस्ती, कोल्हाटी वस्ती, पालिका जलशुद्धीकरण, दक्षिणेकडील झोपडपट्टी आझाद कॉलनी, जिल्हा परिषद हौसिंग सोसायटी, लोकमान्य कॉलनी, ढेबेवाडी रस्त्या लगतचा भाग, सर्वोदय बॅकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी.
  • (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण खुला) - इंद्रप्रस्थ कॉलनीतील दक्षिणेचा डोंगरापर्यतचा भाग, माने वखारीपासून दक्षिणेकडील रस्त्याचे पूर्व भाग, वृंदावन कॉलनी, धर्मवीर संभाजीराजे कॉलनी, कृष्णा हॉस्पिटल, विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, कोयना औद्योगिक वसाहत, शिवदर्शन हौसिंग सोसायटी, व्यंकटेशनगर, खंडोबानगर, साई शिक्षक कॉलनी, थोरात मळा. 
  • (तीन सदस्य प्रभाग - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला) - गावठाण, लक्ष्मीनगर, अनुराज अपार्टमेंट, अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याचे दक्षिणेकडील व मुख्य रस्ता, औदुंबर कॉलनी, हिंगसे किराणा स्टोअर्स, डॉ. बने यांचे घर, शिवाजीनगर मुख्य रस्त्याचे पूवेकडील व पश्चिमेकडील संपूर्ण भाग, जगदाळे मळा, स्मशानभूमी, रिलायन्स पेट्रोल पंप, बोरगे मळा, शिंदे मळा, बागल मळा, खरवत ओढा ते मळाईदेवी पतसंस्था पर्यंतचा भाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com