"म्हैसाळ'चे पाणी सलगरे हद्दीत

"म्हैसाळ'चे पाणी सलगरे हद्दीत

सांगली - म्हैसाळ योजनेचे पाणी आज झपाट्याने पुढे सरकले. उपसा करणाऱ्या पंपांची संख्या वाढवल्याने कालव्यातील पातळीही वाढली आहे. आज सकाळी बेडग येथे तिसऱ्या पंपगृहात पोहोचले होते; शिवाय कालवा अर्धाअधिक भरुन वाहत होता.

काल सकाळी अकरा वाजता पहिल्या पंपगृहातील पाच पंप सुरु करण्यात आले. पैसे भरल्याविना पाणी नाही या प्रशासनाच्या भूमिकेने शेतकऱ्यांना पाणी उपसा करता आला नाही; त्यामुळे पाणी गतीने पुढे सरकत राहीले. दुपारनंतर सलगरे व कवठेमहांकाळच्या दिशेने प्रवाह वाहता राहीला. पहिल्या पंपगृहात 5, दुसऱ्यात 6, तिसऱ्यात 2 व चौथ्या टप्प्यात एक पंप पाणीउपसा करत आहे. पाणी बेळंकी व शिपूर हद्दीत पोहोचले आहे.

गव्हण आणि डोंगरवाडी योजना सुरु करुन तासगाव तालुक्‍यालाही पाणी देण्याचे उद्दिष्ठ्य असून त्यानंतर थेट जत तालुक्‍यापर्यंत सोडले जाईल. शेतकऱ्यांनी पैसे भरल्यानंतरच शाखा कालवे व वितरिकांमध्ये पाणी सोडले जाईल. 

पावसाअभावी कोरड्या असणाऱ्या कालव्यांत पाणी गतीने पुढे सरकत होते. काही शेतकऱ्यांनी मागणी नोंदवून कालव्यात पंप टाकण्याची तयारी केली होती. पावसाअभावी तलाव कोरडे आहेत; त्यामुळे ते भरुन घ्यावेत आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे.

बनेवाडी, डोंगरवाडी या योजनाही टप्प्याटप्प्याने सुरु केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी मागणी नोंदवून पाणी घेण्यास पुढे येण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com