म्हसवड येथे श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

म्हसवड (सातारा): "सिध्दनाथाच्या नावानं चांगभल"च्या जयघोषात गुलाल खोब-याची उधळण करीत सुमारे चार लाख भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व देवी जोगेश्वरीचा चार चाकी रथ मिरवणुकीने श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज (बुधवार) देव दिवाळीस झाली.

श्रींच्या रथावर भाविकांनी उधळण केलेल्या गुलाल-खोब-याने संपुर्ण यात्रा परिसर गुलालमय होऊन गेला. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यामधील असंख्य भाविकांचे कुलदैवत संबोधले जात असलेले सातारा जिल्ह्यामधील म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरीचं देवस्थान मंदीर माण नदीच्या काठावर आहे.

तेराव्या शतकात हेमाडपंथीय बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना म्हणुन या मंदीराची ख्याती आहे. श्री सिध्दनाथ काशी विश्वेशरचा अवतार संबोधला जातो. दीपावली पाडव्यास पारंपारिक पध्दतीने श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभ होतो. श्रींच्या उत्सव मुर्तींना हळदी लावणे, त्यानंतर तुलशी विवाहच्या मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहा नंतर आज देवदिवाळीस वधु-वराची वरात म्हणेजच रथ मिरवणुकीने या शाही विवाह सोहळ्याची सांगता केली जाते. आज सोहळ्यास लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

रिंगावण पेठ मैदानातून संपर्ण नगरप्रदक्षिणेस भावींकींनी चार चाकी रथ दुपारी दोन वाजता ढोलाचा निनाद होताच सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषणांनी व सारा परिसर दुमदुमुन गेला. भाविकांना जाड दोरखंडाच्या साह्यने श्रींचा रथ ओढीत मार्गस्थ होतात उपस्थित भाविकांनी गुलाल-खोब-याची उधळण केली. नारळाची तोरणे नवसाची रंगबिरंगी निशाणे रथावर बांधण्यास भाविकांची झुंबड उडाली होती.

Web Title: mahswad: Siddhanath Temple and devi jogeshwari