esakal | यात्रेचा मुख्य दिवस.. अन्‌ चिटपाखरूही नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Main day of the festval & no one was there

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराद्य दैवत श्री बिरोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस होता. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी वर यात्रा रद्द केल्याने मंदिर परिसरात चिटपाखरूही नव्हतं. 

यात्रेचा मुख्य दिवस.. अन्‌ चिटपाखरूही नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराद्य दैवत श्री बिरोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस होता. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी वर यात्रा रद्द केल्याने मंदिर परिसरात चिटपाखरूही नव्हतं. 

आरेवाडी येथील बिरोबा देवाची यात्रा गुडिपाडव्यापासून भरण्यास सुरुवात होते. पाडव्याच्या सातच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. आज मंगळवार (ता. 31) यात्रेचा मुख्य दिवस होता. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा राज्यातून सुमारे चार ते साडेचार लाख भाविक हजेरी लावतात व बिरोबा देवाचे दर्शन घेतात.

यात्रेच्या मुख्य दिवशी सुमारे दहा हजार बकरी कापली जातात. मात्र कोरोणा व्हायरसच्या पार्श्वभूमी वर यात्रा प्रशासन व देवस्थान समिती पदाधिकारी यांनी रद्द केली आहे. मंदिर समोरून पडद्याने झाकण्यात आले आहे. मंदिराच्या समोर व चारही बाजूंना तसेच नागज फाटा येथे यात्रा रद्द असल्याबाबत फलक लावण्यात आले आहेत. तसेच मंदिराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या परिसरात कोणीही फिरकलेले नाही. नेहमीप्रमाणे सकाळी पाच पुजार्यांनी आरती पुजा करून मंदिर बंद करण्यात आले. 

कोरोणा लवकर जाऊ दे
जगभरात चाललेल्या कोरोणाच्या हाहाकारामुळे आम्ही यत्रा रद्द केली आहे. बिरोबा देवाकडे आम्ही एकच मागणे मांडले आहे की आपल्या देशातून कोरोणा लवकर जाऊदे यात्रा मोठ्या प्रमाणावर भरवून सर्व भाविक सुख समाधानी नांदतील. 

- रामचंद्र पाटील, देवस्थान समितीचे पदाधिकारी व पोलिस पाटील