सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कंटेनर क्र. एच. आर. 61 डी. 1399 हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. दोन्ही वाहने देवडी शिवारात येताच कंटेनरने मोटार सायकल ला पाठीमागून जोराची धडक झाली. त्यात आनंदचा जागीच मृत्यु झाला.  

मोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारात सोमवारी दुपारी 1 वाजता घडली. आनंद उत्तम थोरात (19) रा. देवडी असे मृताचे नाव आहे.

मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत आनंद हा मोटार सायकल क्र. एम. एच. 13 ई. 5074 वरून महादेवाच्या दर्शनाला निघाला होता. तर कंटेनर क्र. एच. आर. 61 डी. 1399 हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. दोन्ही वाहने देवडी शिवारात येताच कंटेनरने मोटार सायकल ला पाठीमागून जोराची धडक झाली. त्यात आनंदचा जागीच मृत्यु झाला.  

ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या आठवड्यापासुन सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणापासून एकेरी वाहतुक सुरू आहे. काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळेच अपघातात वाढ होत असल्याचे मत मृत आनंदच्या नातेवाईकांनी सांगितले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून कंटेनर चालक दलबीर इमेराज सिंग रा. पिलाई जम्मु यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार नागप्पा निंबाळे करीत आहेत. 

 

Web Title: major accident at solapur pune national highway one died