सोलापूर-पुणे महामार्गावर एसटीला भीषण अपघात

bus
bus

सोलापूर : हैदराबादहून पुण्याकडे निघालेल्या आंध्र प्रदेश राज्य परिवहन सेवेच्या एसटीने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत एसटीतील 13 प्रवासी जखमी झाले असून, तीनजणांची स्थिती गंभीर आहे.

जखमी झालेले हैदराबादमधील आहेत. स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे या भीषण दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासमोर आज शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना झाली. . 

सोलापूर एसटी आगार व्यवस्थापक दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली. पुण्याच्या दिशेने निघालेल्या एसटीने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ट्रकच्या बॅटरीला धडक दिल्याने एसटीने तातडीने पेट घेतला, आग इतकी भीषण होती आतील प्रवाशी जिवंत राहतील की नाही याची शंका होती. मात्र स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे एकही जिवीत हानी झाली नाही. एसटी पूर्णपणे जळून खाक झाल्याने ती कोणत्या आगाराची आहे आणि कुठून कुठे निघाली याची माहिती मिळाली नाही. सोलापूरचे एसटी अधिकारी आंध्र प्रदेश एसटी विभागाच्या संपर्कात आहेत.

गंभीर जखमी झालेले प्रवासी : अस्लम महिबूब सय्यद (वय-27, रा. चारमिनार हैदराबाद), अजमेश रामय्या भिकू (वय-32, रा. हैदराबाद) आणि मादय्या रामलू बोफीदी (वय-32, रा. महिबूबनगर). हे तिघे शुद्धीवर असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्राला कळवूनही तब्बल एक ते दीड तासांनी पोलिस आल्याचा आरोप अपघातग्रस्तांना मदत करणार्या तरुणांनी केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com