सोलापूर - महापालिका सभा संपल्यावर अनेकांची "हजेरी' 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 17 जुलै 2018

सोलापूर : महापालिकेची सभा सुरू होऊन तहकूब होईपर्यंत सभागृहात सात जण उपस्थित असताना हजेरीपुस्तिकेत मात्र तब्बल 27 नगरसेवकांची हजेरी लागली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार सभा संपल्यानंतर हजेरीपुस्तिकेवर स्वाक्षरी करणे किंवा करू देणे बेकायदेशीर आहे. 

महापालिकेची जुलैची सभा सोमवारी झाली. सभा सुरू झाली त्यावेळी सभागृहात सात नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे महापौर शोभा बनशेट्टी यांनी कोरमअभावी सभा तहकूब केली. सभा संपल्यावर अनेक नगरसेवक व नगरसेविका सभागृहात आले, त्यांनी हजेरीपुस्तकावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यास बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी हरकत घेतली, पण सह्या घेण्याचे काम सुरूच होते. 

कॉंग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर महापौरांच्या समोरच महापौर कक्षात बसून हजेरीपुस्तकावर स्वाक्षरी केली. काही नगरसेविकांनी इच्छा असूनही स्वाक्षरी केली नाही. मात्र, हा गैरप्रकार महापौर कार्यालयात बिनधास्तपणे सुरू होता. तो खुद्द महापौरांनीच थांबविणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. मागे एकदा असेच सभेत तीनजण उपस्थित असताना उशिरा आलेल्या नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला होता. 

संन्याशाला होणार फाशी 
नगरसचिव कार्यालयाच्या भोंगळ कारभाराबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या. नगरसचिवाच्या सहीनेच नगरसचिवाला हटविण्याचा प्रस्ताव अजेंड्यावर आला. ढिसाळ कारभाराबाबत नगरसचिवांना निलंबित करण्याची शिफारस स्थापत्य समितीने केली. खुद्द आयुक्तांनाही गेल्या आठवड्यात नगरसचिवांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अनुभव आला. मात्र, सोईने पक्ष बदलणाऱ्या नगरसेवकांच्या "हट्टा'पायी काहीच कारवाई झाली नाही. आता स्वाक्षरी घेण्याच्या प्रकरणात हजेरीपुस्तक नेलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई होईल. नगरसचिव नेहमीप्रमाणे बिनधास्त राहणार, कारण त्यांना माहिती आहे, जोपर्यंत "धनुष्य'सोबतीला आहे, तोपर्यंत कारवाईचे धाडस "कमळा'कडून होणार नाही. 

खुद्द महापौरांच्या समोर त्यांच्याच कार्यालयात सभेच्या वेळी सभागृहात नसलेल्या नगरसेविका हजेरीपुस्तकावर सह्या करीत होत्या आणि सर्वजण हा प्रकार गप्प पहात होते. कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसलेल्या खातेप्रमुखावर कारवाई करावी. 
- आनंद चंदनशिवे, गटनेता, बसप

Web Title: major are present after municipal corporation meeting