सातारा जिल्ह्यात महसूल खात्यात मोठे बदल 

- विशाल पाटील
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सातारा : महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच महसूल विभागाने काढले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या पुणे विभागात बदल्या झाल्या. 

सातारा : महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच महसूल विभागाने काढले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या पुणे विभागात बदल्या झाल्या. 

साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील यांची सांगलीच्या भूसंपादन क्रमांक नऊ उपजिल्हाधिकारीपदी नियुक्‍ती झाली असून त्यांच्या रिक्‍त जागी सिडको, नवी मुंबईचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांची बदली झाली. वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांची पुणे येथे अन्नधान्य वितरण अधिकारीपदी बदली होऊन, त्यांच्या जागी गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांची बदली झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची सांगलीच्या भूसंपादन क्रमांक एक उपजिल्हाधिकारीपदी बदली होऊन त्यांच्या जागी पुणे येथील सहायक आयुक्‍त स्नेहा किसवे यांची तसेच भोर (जि. पुणे) येथील उपविभागीय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची भूसंपादन क्रमांक नऊ उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली. 

कऱ्हाडचे तहसीलदार राजेंद्र शेळके यांची उजनी पुनर्वसन प्रकल्पाच्या तहसीलदारपदी, भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण यांची सहायक जिल्हा पुरवठा अधिकारीपदी, माळशिरसचे तहसीलदार बी. एस. माने यांची माणच्या तहसीलदारपदी, हातकणंगलेच्या तहसीलदार वैशाली राजमाने यांची संजय गांधी योजना तहसीलदारपदी, वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची पुरंदर तहसीलदारपदी, जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदार जयश्री आव्हाड यांची खटाव तहसीलदारपदी, खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची करमाळा तहसीलदारपदी, गडहिंग्लजचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची कऱ्हाड तहसीलदारपदी, महाबळेश्‍वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांची वाई तहसीलदारपदी, विभागीय आयुक्‍त कार्यालयातील तहसीलदार मीनल कळसकर यांची महाबळेश्‍वर तहसीलदारपदी बदली झाली आहे. 

Web Title: Major changes in revenue department in Satara district