हरणांचा बाजार शेतकरी बेजार! 

सुनील नवले
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

श्रीरामपूर : गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये हरणांच्या कळपांनी धुमाकूळ घातला आहे. कळपांकडून रब्बी हंगामातील कोवळ्या पिकांचे नुकसान होत आहे. परतीच्या पावसाने खरिपाचे आधीच नुकसान झाले. त्यात आता हरणांमुळे रब्बीची पिकेही हाती येतात की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा सुपा एमआयडीसीत थर्माकोलचा तलाव 

श्रीरामपूर : गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये हरणांच्या कळपांनी धुमाकूळ घातला आहे. कळपांकडून रब्बी हंगामातील कोवळ्या पिकांचे नुकसान होत आहे. परतीच्या पावसाने खरिपाचे आधीच नुकसान झाले. त्यात आता हरणांमुळे रब्बीची पिकेही हाती येतात की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा सुपा एमआयडीसीत थर्माकोलचा तलाव 

तालुक्‍यातील कमालपूर, भामाठाण, खानापूर, महांकाळ वाडगाव, माळवाडगाव, घुमनदेव परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे होऊनही अद्याप भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. शेतकऱ्यांनी सध्या ज्वारी, गहू, हरभरा, मका पिकांची पेरणी केली. हरणांचे कळप कोवळ्या पिकांवर ताव मारून त्याचा फडशा पाडत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

deer

भामाठाण : परिसरात मुक्तपणे फिरत असलेले हरणांचे कळप कोवळ्या पिकांवर ताव मारून पिके फस्त करीत आहेत. 

तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार 
हरणांचे शेकडो कळप कोवळ्या पिकांवर ताव मारून प्रचंड नुकसान करीत आहेत. हरिण मारल्यास गुन्हा दाखल होत असल्याने शेतकरी "तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार' सहन करीत आहेत. हरणांच्या कळपांचा बंदोबस्त करण्याबाबत वन विभागाकडे शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

हेही वाचा आम्हाला आधारभूत केंद्र पाहिजे 

हरणांचे सर्वेक्षण करावे 
हरणांकडून कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने रब्बी हंगामही हातचा जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. हरणांच्या कळपांचा तातडीने बंदोबस्त करावा, व्याघ्रगणतीप्रमाणे हरणांचे सर्वेक्षण करून त्यांना पकडावे, अशी मागणी माजी सरपंच गंगाधर बनसोडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय बनसोडे, उत्तम आसने, शरद आसने, संदीप पिंपळे, अमोल मोरे, राजेंद्र बनसोडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. 

पिके उद्‌ध्वस्त केली 
जनावरांसाठी केलेल्या घास पिकाचे नुकसान होत असल्याने हे पीक घेणेच शेतकऱ्यांनी बंद केले आहे. हरणांकडून कोवळी पिकेच उद्‌ध्वस्त केली जात असल्याने मोठे नुकसान होत आहे. मारताही येत नाही, पिकेही वाचवू शकत नाही, अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे. 
- दिनकर बनसोडे, उपसरपंच, भामाठाण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major damage to crops due to deer