हुतात्मा स्मारकात पुस्तके उपलब्ध करून देऊ - विजय शिवतारे

सातारा - पालिकेने नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मारकाचा लोकार्पण सोहळा बुधवारी विजय शिवतारे यांच्या उपस्थित झाला. त्या वेळी श्वेता सिंघल, राजू भोसले, शंभूराज देसाई, माधवी कदम.
सातारा - पालिकेने नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मारकाचा लोकार्पण सोहळा बुधवारी विजय शिवतारे यांच्या उपस्थित झाला. त्या वेळी श्वेता सिंघल, राजू भोसले, शंभूराज देसाई, माधवी कदम.

सातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी, यासाठी हुतात्मा स्मारक ही प्रेरणास्थळ आहेत. येथे नतमस्तक होऊन युवा पिढीने येथे हुताम्यांची आत्मचरित्रे वाचावीत म्हणून वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

सातारा पालिकेने हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण केले असून, त्याचा लोकार्पण सोहळा श्री. शिवतारे यांच्या उपस्थित झाला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, मानसिंगराव शिंदे, पतंगराव फाळके उपस्थित होते.

श्री. शिवतारे म्हणाले, ‘‘जळगाव जिल्हा जसा केळीचा, नागपूर जसा संत्र्यांचा तसा सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे बिरुद खूप अभिमानास्पद असेच असून, या जिल्ह्यातील शेकडो सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून लढले. ते आमची कायमची प्रेरणा आहेत म्हणून आम्ही जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांना निधी देऊन त्यांचे नूतनीकरण करून त्यात वाचनालय, संरक्षक भिंती, उद्यान ही कामे केली आहेत. या स्मारकांमध्ये विविध हुतात्म्याचे चरित्र, त्यांच्या शौर्य कथा असलेले साहित्य ठेवले जाईल. यातून युवकांना नवी प्रेरणा मिळण्यास उपयोग होईल. ही भूमी छत्रपती, प्रती सरकार स्थापन करणाऱ्या नाना पाटील व महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची आहे त्यामुळे फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारे काम या भूमीतून झाले आहे. या वेळी स्वातंत्र्यसैनिक मानसिंग पवार, पतंगराव फाळके, सोपानराव घोरपडे, (कै.) सखाराम किरदर यांचे चिरंजीव तुकाराम किरदर, (कै.) अण्णासाहेब शेट्टे यांचे चिरंजीव महेश शेट्टे, (कै.) गुलाबराव फडतरे यांचे चिरंजीव गंगाधर फडतरे आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला. राजू भोसले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com