शाळा समृद्ध, आदर्शवत बनवा : संजय भागवत

शाळा समृद्ध, आदर्शवत बनवा : संजय भागवत

सातारा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समृध्दी पर्व (विभागीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम) अंतर्गत आज जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह हायस्कूलला भेट दिली. "शाळा समृद्ध, आदर्शवत बनवा,' असे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले. 

पुणे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत पुणे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणांनी शाळांना भेटी देवून शिक्षकांना शुभेच्छा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष श्री. भागवत यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना शाळांना भेटी देवून त्यावर माहिती, फोटो अपलोड करण्यासाठी संकेतस्थळाची लिंक पाठवली होती. श्री. भागवत यांनी प्रतापसिंह हायस्कूलला भेट देवून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जावळीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण उपस्थित होते. श्री. भागवत म्हणाले, ""शाळा आदर्शवत बनल्या पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी झोकून देवून प्रयत्न करावेत. शाळांचा ऐतिहासिक वारसा जोपासून तो अधिक समृद्ध करावा.'' दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सदरबझार येथील तक्षशीला शाळेत, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी कृष्णानगर, जिल्हा कौशल्य व विकास, रोजगार, स्वयंरोजगार विभागाचे उपसंचालक सचिन जाधव यांनी रा. ब. काळे प्राथमिक विद्यामंदिर या शाळेस भेटी देवून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. 


टेक्‍नोसॅव्ही फिडबॅक 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भागवत यांनी टेक्‍नोसॅव्ही पध्दत वापरून सर्व अधिकाऱ्यांना लिंक फॉरवर्ड केली. जे अधिकारी भेटी देतील, त्यांनी त्या लिंकद्वारे शाळा, वैयक्‍तिक माहिती तसेच फिडबॅक आणि सेल्फी अथवा फोटो अपलोड करण्याची सूचना दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही त्याचा अवलंब केल्याने प्रशासनाला वेळोवेळी सर्व माहिती मिळत राहिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com