लोणची, पापड,चिप्स,चकल्याची लागली रांग;उन्हाळी वाळवणासाठी महिलांची लगबग

make summer dishes start now sangli marathi news
make summer dishes start now sangli marathi news

बोरगाव (सांगली) : उन्हाळा सुरू झाला की ग्रामीण भागात मसाले त्याचबरोबरीने लोणची, पापड यासारखे वर्षभरासाठी वाळवणाचे उन्हाळी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी महिलांमध्ये लगबग दिसून येते. निंबळक (ता. तासगाव) परिसरात महिलांची आता वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. 

पूर्वी शेती मशागतीतून उसंत मिळताच व पुढे लग्न कार्य असल्यास किंवा हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया, कुरड्या, बाजरीपासून खारोड्या वडे, ज्वारीपासून पापड, तांदळापासून पापड, चकल्या, उडीदापासून वडे, पापड, मुगाची डाळ मूगवड्या, बटाट्यापासून चिप्स, चकल्या, शाबुदाना चिप्स, चकल्या आदी वाळवणाचे पदार्थ वर्षभर घरात वेगवेगळ्या वेळी किंवा सणावारासह उपवासासाठी तळून वापरले जातात. हा वानोळा प्रत्येक घरात असावा यासाठी महिलांची धडपड असते. पूर्वी सर्व खरीप रब्बी पिके घरात काढून आणल्यानंतर उष्ण ऋतूमध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी कामाला लागतात.

उन्हाळ्यात अनेक ठिकाणी उन्हाळी पदार्थांचा रंगबेरंगी थाट सजल्याचे चित्र अनेकांच्या दारी पाहायला मिळते. त्यामुळे गावातील महिला वर्गाचा उन्हाळी वाळवणासाठी एकत्रित कामेही करताना दिसतात. तसेच गरजू महिलांना वाळवणासाठी आणि मसाला विक्रीतून अर्थाजन होत असते. त्यात लोणची, पापड, विविध मसाले, कुरडई, उपवासाचे वाळवण हा सारा खाद्यपदार्थांचा पसारा दिसतो. ग्रामीण भागात महिला हे पदार्थ घरीच तयार करत असतात. आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले असून त्यामुळे रोजगार तयार झाला आहे. काही महिला रोजंदारीवर मदत करत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com