समाजात काम स्वतःचे म्हणून करा- हनुमंत गायकवाड

राजकुमार शहा 
शनिवार, 28 जुलै 2018

समाजात काम करताना कुठेही करा, पण ते माझे म्हणून करा. विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत ही आमची संकल्पना असून त्या माध्यमातून काम सुरु आहे, स्वतःला कमी लेखु नका, आत्मपरीक्षण करा, व्यवसायाच्या खुप संधी आहेत, त्याचा शोध घ्या, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.
 

मोहोळ- समाजात काम करताना कुठेही करा, पण ते माझे म्हणून करा. विषमुक्त शेती व रोगमुक्त भारत ही आमची संकल्पना असून त्या माध्यमातून काम सुरु आहे, स्वतःला कमी लेखु नका, आत्मपरीक्षण करा, व्यवसायाच्या खुप संधी आहेत, त्याचा शोध घ्या, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.

खंडाळी (ता. मोहोळ) येथे विषमुक्त शेती व निरोगी भारत या विषयावर आयोजित शेतकरी मेळाव्यात गायकवाड़ बोलत होते. डीसीसीचे माजी अध्यक्ष राजन पाटील यावेळी अध्यक्षस्थानी होते. व्यासपिठावर चन्द्रभागाचे अध्यक्ष कल्याण काळे, काँग्रेसचे प्रकाश पाटील, देवानंद पाटिल, महादेव देठे, दिलीप कोरके, कृषि अधीक्षक बसवराज बिराजदार, पोलिस उपनिरीक्षक नाना कदम, भारत रानरुई इंडोनिशियाचे सादिक काझी, समाधान भोसले, डॉ कैलास करांडे, सरपंच लता मुळे, उपसरपंच जयश्री मुळे, विकास पाटिल, गणेश मुळे, अरुण कवडे, आदी उपस्थित होते.

गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी युवकांनी आता बाजार पेठेचा अभ्यास करून ती शोधली पाहिजे, तेल बियांचे उत्पादन वाढले पाहिजे, माती, पाणी परीक्षण करून घेणे काळाची गरज आहे, उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला पाहिजे, शासनाच्या योजनांचा फायदा घ्या, देशी गायींचे संगोपन करा, जगात अत्यंत चांगले बरेच आहे ते शोधा ज्ञानाची दारे कायम खुली आहेत.

कृषि अधीक्षक बिराजदार म्हणाले यावेळी म्हणाले की, चालु वर्षी साडेचार हजार हेक्टरवर बांधबंदिस्ती केली आहे, जिल्हा प्रगत आहे सव्वा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, प्रतिष्ठा व पैसा हा शेतीतुनच मिळतो.

यावेळी, कल्याण काळे, राजन पाटिल, सादिक काझी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तसेच, यावेळी 400 रुपयात एकरी 80 टन उसाचे उत्पादन घेतल्या बद्दल पापरीचे शेतकरी विलास टेकळे यांचा सत्कार करण्यात आला आणि सूत्र संचलन विकास पाटील यांनी केले तर आभार कृष्णा पाटिल यांनी मानले.

Web Title: Make the work of society as its own says hanumant gaikwad