तिकडे शिवेंद्रसिंहाराजे भाजपात इकडे मकरंद पाटील जिल्हा बॅंकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली.

सातारा : जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता जिल्हा बॅंकेत हालचाली गतीमान झाल्या आहेत. (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या संचालक पदाच्या रिक्त असलेल्या जागेवर त्यांचे पूत्र आमदार मकरंद पाटील यांना आज (बुधवार) घेण्यात आले.
(कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे चिरंजीव व वाईचे आमदार मकरंद पाटील यांना संचालक पदावर घेण्यात आले. आज (बुधवार) बॅंकेचे संचालक मंडळाची अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या अनुपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुनील माने हाेते. या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपूरे, नितीन पाटील, प्रदीप विधाते, अर्जुन खाडे, दत्तानाना ढमाळ आदी उपस्थित हाेते. या बैठकीत सर्वानुमते पाटील यांची निवड करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makrand Patil enters in district cooperative bank !