मालतीताई किर्लोस्कर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

सांगली - ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मालतीताई शंकरराव किर्लोस्कर (वय 94) यांचे निधन झाले. "किर्लोस्कर श्री' मासिकाचे संस्थापक शंकरराव किर्लोस्कर यांच्या त्या कन्या होत्या, तर मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या त्या भगिनी होत्या. 

मालतीताईंना आज सकाळी श्‍वासाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले. तेथेच त्यांनी मराठीच्या प्राध्यापिका म्हणून 38 वर्षे सेवा केली होती. त्यांची "भक्तिभाव' आणि "फुलांची ओंजळ' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध दैनिके, साप्ताहिकांमध्ये विपुल लेखन केले आहे. त्यांचा वाचन व्यासंग मोठा होता. 

Web Title: Malatitai Kirloskar dies