मलकापूरलाही भाजपचाच नगराध्यक्ष

bjp
bjp

कऱ्हाड : मलकापूरच्या पालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे पालिकेत भाजपचीच सत्ता व भाजपचाच नगराध्यक्ष असणार आहे, असा विश्वास विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी व्यक्त केला. 

श्री. भासले यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मलकापूरच्या सत्ताधारी मनोहर शिंदे यांच्या गटावर तोफ डागली. श्री. भोसले म्हणाले, सत्ता आहे म्हणून कोणाचाही जागांवर, घरावर आरक्षण टाकून तुम्ही तुमचा विकास दाखवत आहात. आता ते चालणार नाही. विकास करताना सामान्यांवर होणार अन्याय कसा सहन केला जातो. पालिकेने शंभर फुटी रस्त्याचा घाट घातला आहे. मात्र आम्ही साठ फुटी रस्त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. आमची पहिल्यापासून पालिका करण्याची मागणी होती. मात्र सत्ताधारीच ते होवू देत नव्हते. वस्तूस्थितीनुसार मागणी होत असते. काही लोकांनी नगरपंचायतीची मागणी केली होती. मात्र आता सध्याच्या स्थितीत त्यांची मागणी पालिकेची आहे.

मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतच भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे पालिकेत सत्ता भाजपचीच व नगराध्यक्षही भाजपचाच असेल. यात आम्हाला तीळमात्र शंका नाही. कऱ्हाड पालिकेतील उपाध्यक्षांसह काही नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले असेल तर ते खरच असेल. दादा सांगतात म्हणजे ते लोक निश्चीतच भाजपात आले आहेत. 

ते म्हणाले, कऱ्हाड दक्षिणेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री व 35 वर्षे आमदारकी केलेल्या दोन गटांना एकत्र यावे लागले यातही आमचे यश आहे. भाजपला रोखण्यासाठी या दोन्ही गटाला अनेक ठिकाणी राष्ट्रवादीनेही साथ केली आहे. त्यामुळे सर्वपक्षांनी एकत्रीत येवून भाजपला रोखण्याचा केलेला प्रयत्न हाच आमचा विजय आहे. त्यांनी एकत्र येण्याची वेळ आली हेही कमी नाही. कारण यांनी भाजप हाच एकमात्र विरोधक आहे, असे त्यांनी हरएकप्रकारे मान्य केले आहे यातही आमचा विजय आहे हा असा चढता आलेख भविष्यात राहील.

दादांचे स्वागतच 
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कऱ्हाड दक्षिणेतून मंत्री चंद्रकांत पाटील यांना उभा राहण्याचे आवाहन केले आहे, या प्रश्नावर श्री. भोसले म्हणाले, राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील सगळ्याच मतदार संघात चंद्रकात दादाचे काम सुरू आहे. ते राज्यातील कोणत्याही मतदारसंघात उभे राहिले तरी त्यांचे स्वागत होईल. यात शंका नाही. ते कऱ्हाड दक्षिणेतून आले तर त्यांचे आम्ही या मतदार संघ एका पायावर मतदारसंघ सोडण्यास तयार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com