अपंगांना दरमहा एक हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मलकापूर - नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पात्र अपंग व्यक्तींसाठी नगरपंचायतीने महात्मा गांधी आहार पेन्शन योजना जाहीर केली आहे. एक ऑक्‍टोबरला ज्येष्ठ नागरिकदिनी या योजनेचा प्रारंभ होणार आहे. येथील पात्र लाभार्थींना दरमहा एक हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. तो ठराव आज येथे झालेल्या नगरपंचायतीच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता पोळ होत्या. 

शासनाच्या निकषानुसार नगरपंचायतीच्या उत्पन्नातील तीन टक्के रक्‍कम अपंग व्यक्तींसाठी खर्च करावी लागणार आहे. त्यानुसार नगरपंचायतीने तीन टप्प्यात ही योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये शून्य ते ५० टक्के अपंग व्यक्तींना ७०० रुपये, तर त्यापुढील व्यक्‍तींना एक हजार रुपये मिळतील. अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यसैनिक (कै.) भास्करराव शिंदे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दरमहा एक हजार रुपये मिळतील.

इतरांसाठी शिलाई मशिन, पिको फॉल मशिन, आटाचक्की, सायकल, अंधकाठी आदी साहित्यांचे वाटप केले जाईल. सुमारे साडेसात लाख रुपयांचा बोजा नगरपंचायतीवर पडेल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. 

नगरपंचायतीने शासनाच्या १२७ आरक्षणांपैकी ५१ आरक्षणे राहावीत, अशी मागणी केली होती. मात्र, शासनाने ती संख्या ६३ कायम केली असून ज्या शेतकऱ्यांवर दोन ठिकाणी आरक्षणे आहेत, ती रद्द करण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. आरक्षणे राहावीत यावर नगरपंचायत ठाम आहे. 
विद्युत विभागाचे कर्मचारी सूचना देऊनही कामे करत नसल्याची तक्रार बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मोहन शिंगाडे यांनी केली. 

त्यावर उपाध्यक्ष मनोहर शिंदेंनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. मुख्याधिकारी दळवी यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

सभेतील महत्त्वाचे निर्णय
सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या वाढवण्यास परवानगी 
आरक्षणातील जागा थेट वाटाघाटीने घेणार
जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर झोपडपट्टीतील शौचालयांसाठी 
करदात्यांना ३० सप्टेंबरपर्यंत दहा टक्के सूट
आस्थापना कर्मचाऱ्यांना दहा हजार सानुग्रह अनुदान
आरोग्य कर्मचाऱ्यांना साडेअकरा हजार
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना साडेदहा हजार

Web Title: malkapur news 1000 rupees for handicaped