esakal | ‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल’च्या उपाध्यक्षपदी मालाेजीराजे
sakal

बोलून बातमी शोधा

‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल’च्या उपाध्यक्षपदी मालाेजीराजे

कोल्हापूर - केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली. तर जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांची कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नागपूर येथे झलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.   

‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल’च्या उपाध्यक्षपदी मालाेजीराजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली. तर जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांची कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नागपूर येथे झलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.   

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई यांची सन २०१९ ते २०२३ या चार वर्षाकरिता कार्यकारिणी मंडळासाठीची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्ष, पाच उपाध्यक्ष, एक सचिव, तीन सहसचिव, एक कोषाध्यक्ष व १३ कार्यकारी समिती सदस्य यांची निवड करण्यात आली. नागपूर येथे झालेल्या असोसिएशनच्या ७० व्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर कोल्हापूरचे स्पोर्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची सलग चौथ्यांदा उपाध्यक्षपदी निवड झाली. तर केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांची कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली.

सर्वसाधारण सभेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये कोल्हापूरचे तीन प्रतिनिधी मालोजीराजे छत्रपती, माणिक मंडलिक व राजेंद्र दळवी उपस्थित होते.  मालोजीराजे छत्रपती हे कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे पेट्रन मेंबर, अध्यक्ष असून ते राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत. माणिक मंडलिक हे के.एस.ए.चे जनरल सेक्रेटरी व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत.

loading image
go to top