शरद पवार यांना मालोजीराजे पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

फलटण - श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मालोजीराजे नाईक- निंबाळकर यांची ३९ वी पुण्यतिथी व शिवाजीराजे नाईक- निंबाळकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त १४ ते २५ मे अखेर स्मृती महोत्सव आयोजित केला असून, त्यात १९ मे रोजी मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते यावर्षीचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने माजी प्राचार्य विश्‍वासराव देशमुख यांनी सांगितले आहे. 

महोत्सवात हिंदी- मराठी गायनांसह भारुड, संतांची शिकवण, बोलक्‍या भावल्या आदींचे नियोजन करण्यात आलेले असून, २५ मे रोजी आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आणि रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील कलावंतांना बक्षीस वितरण व सत्कार समारंभांचे आयोजन केले आहे. 

महोत्सवात १४ मे रोजी इंद्रधनू प्रदर्शित हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम राजेश दातार, भाग्यश्री गोसावी व त्यांचे सहकलाकार सादर करणार आहेत. १५ रोजी प्रा. श्‍याम जोशी हे ‘श्रवण कौशल्य’, १६ रोजी प्रा. प्रीती पाटील- शिंदे या ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ या विषयावर बोलतील. १७ मे रोजी श्रीकांत सावंत हे मराठी- हिंदी निवडक गीतांच्या मैफलीबरोबरच भक्तिगीत, भावगीत, लावण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. १८ रोजी वसंतराव हंकारे ‘जगु आनंदे’ या विषयावर बोलतील. १९ मे रोजी मालोजीराजे स्मृती पुरस्काराचे वितरण शरद पवार यांना होणार आहे. २० रोजी सई मोने व त्यांचे सहकारी (पुणे) हे ‘भारुडे ही संतांची शिकवण’, 
२१ रोजी अभिनेता योगेश सुपेकर हे ‘हास्य रंग रसिया’ हा एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर करणार आहेत. २२ रोजी ‘चला भारतीय बनुया’ या विषयावर बाबासाहेब नदाफ हे बोलणार असून, २३ रोजी चैताली माजगावकर या  ‘बोलक्‍या भावल्या व पपेट शो’ सादर करणार आहेत. २४ रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांतील कलावंतांच्या कलाविष्काराचे सादरीकरण होणार आहे. 

२५ मे रोजी कलावंतांना पुरस्कार आणि स्मृती महोत्सवाचा समारोप होणार आहे. महोत्सवातील १९ रोजीचा कार्यक्रम मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर, तर उर्वरित सर्व कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहेत.

Web Title: malojiraje award to sharad pawar