फुटबॉल आचारसंहितेसाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कोल्हापूर - फुटबॉलच्या आचारसंहितेसाठी व्यापक समिती नेमून त्यातून ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आचारसंहिता निश्‍चित करणार असल्याचे केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी येथे सांगितले. ‘

कोल्हापूर - फुटबॉलच्या आचारसंहितेसाठी व्यापक समिती नेमून त्यातून ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आचारसंहिता निश्‍चित करणार असल्याचे केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी येथे सांगितले. ‘सकाळ’ने फुटबॉलच्या आजी-माजी खेळाडूंसह आयोजकांना एकत्रित करून फुटबॉल हंगाम सुरू ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते. या ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमातच आचारसंहिता निश्‍चित करण्याचे ठरले होते.

पाटाकडील तालीम मंडळ (अ) आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील अंतिम सामन्यानंतर शाहू स्टेडियमवर हुल्लडबाजी झाली होती. वाहनांची तोडफोड झाली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने केएसएने यंदाच्या फुटबॉल हंगामाला स्थगिती दिली होती. आचारसंहिता निश्‍चित झाल्यानंतरच फुटबॉलला ग्रीन कार्ड दाखविण्याचा निर्णय केएसएने घेतला. या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी बैठक झाली.

विविध तालीम, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा समितीत समावेश 
होणार आहे. तीस ते चाळीस इतकी संख्या असेल. प्रेक्षकांना कशाप्रकारे आचांरसंहिता लावता येईल, खेळाडूंनी नियमांची अंमलबजावणी कशी करावी, आयोजकांना वेळेत सामना सुरू होण्यासाठी नियम करता येतील का, आचारसंहितेनंतरही हुल्लडबाजी झाल्यास कोणती कारवाई होणार, यासाठी मते विचारात घेतली जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धेसाठी पोलिस बंदोबस्त न देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यानंतरही सामन्यासाठी पैसे भरल्यास बंदोबस्त द्यायचा की नाही, याचा निर्णय पोलिस घेणार आहेत.

Web Title: Malojiraje Chhatrapati comment