"दक्षिण-उत्तर'पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस 

"दक्षिण-उत्तर'पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस 

सोलापूर - जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले आहे. 30 सप्टेंबरअखेर माळशिरस तालुक्‍यात सरासरी 41.11 टक्के पाऊस पडला. याउलट "उत्तर'मध्ये 37.60 तर "दक्षिण'मध्ये 39.32 टक्के पाऊस पडला.

माळशिरसपेक्षा या दोन्ही तालुक्‍यांत कमी पाऊस पडूनही त्यांचा दुष्काळी तालुक्‍यात समावेश झालेला नाही. शासनाने सात ऑक्‍टोबर 2017 ला दुष्काळ घोषित करण्याची कार्यपद्धती निश्‍चित केली. त्यानुसार पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण विचारात घेतले जातात. बार्शी तालुक्‍यात सप्टेंबर अखेर सरासरी 59.16 टक्के पाऊस झाला आहे. त्या तालुक्‍याचाही समावेश दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत केला नाही. दुष्काळ घोषित करण्याच्या नव्या कार्यपद्धतीमुळे हे तीन तालुके दुष्काळातून वगळले आहेत का, असाही प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com