भाजपच्या चिटणिसावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

माळशिरस - भाजपचे सोलापूर जिल्हा चिटणीस सुरेश ज्ञानोबा तरंगे यांच्यावर काल (सोमवारी) धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्यात हलविण्यात आले. तरंगे माळशिरसहून आपल्या तरंगफळ या गावाकडे जात असताना सुमारे पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, हा हल्ला राजकीय वादातून की अन्य कशामुळे झाला, याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही.
Web Title: malshiras solapur news bjp chitnis murderer attack

टॅग्स