esakal | दूध बिल खात्यावर वर्ग करणे बंधनकारक; गायदूध दर 25 रू. प्रमाणे देणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Mandatory to deposit milk bil in producer'sl account; then Cow's milk rate will be Rs. 25

उत्पादकांना गायीच्या दुधाचा दर 25 रुपयेप्रमाणे दुधाचे बिल संबंधित उत्पादकाच्या बॅंक खात्यावर जमा करणे बंधनकारक असल्याची माहिती विनायक पाटील यांनी दिली. 

दूध बिल खात्यावर वर्ग करणे बंधनकारक; गायदूध दर 25 रू. प्रमाणे देणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेंतर्गत दूध संस्थांनी उत्पादकांना गायीच्या दुधाचा दर 25 रुपयेप्रमाणे दुधाचे बिल संबंधित उत्पादकाच्या बॅंक खात्यावर जमा करणे बंधनकारक असल्याची माहिती राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, "महाराष्ट्र शासनाने "कोव्हीड 19'मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी दूध उत्पादकांना दिलासा देण्याकरता या योजनेचा कालावधी वाढवला आहे. या योजनेंतर्गत खरेदी केलेल्या दुधास 25 रुपयांप्रमाणे दर देण्यात येत आहे.

मात्र दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी दूध उत्पादकांचे दुधाचे बिल हे संबंधित उत्पादकांच्या बॅंक खात्यावर कॅशलेस पद्धतीने वर्ग करणे आवश्‍यक आहे. ज्या संस्था कॅशलेस पद्धतीने दुधाचे बिल बॅंक त जमा करणार नाहीत, त्या संस्थांना दुधसंघ निर्धारित दूध खरेदी दर देणार नाही. त्यांना शासन मंजूर दर दिला जाईल. कोरोनाच्या महामारीच्या काळात संघाने एक दिवसही दूध संकलन बंद केलेले नाही.

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दूध उत्पादकाला झाला पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. सर्व प्राथमिक दूध संस्था, दूध उत्पादक यांनी याबाबत दूध संघास सहकार्य करावे.' यावेळी सहाय्यक कार्यकारी संचालक पी. डी. साळुंखे, संचालक विकास कांबळे, कार्यालयीन अधीक्षक लालासाहेब साळुंखे उपस्थित होते. 

loading image