माणदेश फाऊंडेशनचा लवकरच पुण्यात स्नेह मेळावा : अध्यक्ष अशोकराव माने

रुपेश कदम
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

माणदेश फाऊंडेशन दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या पुरस्काराने सन्मानित करते.

मलवडी: माणदेश फाऊंडेशन पुणे या सामाजिक संस्थेचा स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण सोहळा लवकरच पुणे येथे संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोकराव माने, उपाध्यक्ष विजयराज पिसे, कार्याध्यक्ष प्रविण काळे व सचिव अभिजीत माने यांनी दिली. माणदेश फाऊंडेशन दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या पुरस्काराने सन्मानित करते.

माजी विभागीय आयुक्त व माणदेश फाऊंडेशनेचे मार्गदर्शक प्रभाकर देशमुख व आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनच्या कार्यकारिणीची पुणे येथे बैठक झाली. सदर बैठकीस फाऊंडेशनेच्या सल्लागार विश्वस्त अनुराधा देशमुख, सपना वाघमोडे  अध्यक्ष अशोकराव माने, उपाध्यक्ष विजयराज पिसे, कार्याध्यक्ष प्रविण काळे, सचिव अभिजीत माने, माजी अध्यक्ष सूनिल बाबर, माजी अध्यक्ष अभय जगताप, संदीप सुळे, मिलिंद पिंगळे, आनंदराव जगताप, यशवंत काळेल, सर्जेराव भोसले आदी विश्वस्त उपस्थित होते.

मुळचे माण तालुक्यातील रहिवाशी परंतू कामानिमित्त पुणे तसेच इतर ठिकाणी स्थायिक असणाऱ्या नागरिकांना एकत्र आणण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या माण तालुक्यातील गुणीजनांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

प्रशासकीय, उद्योग, सामाजिक, आदर्श माता, आदर्श गाव, आदर्श शिक्षक, कला, क्रिडा, सहकार, वैद्यकिय, शैक्षणिक, शेती, कामगार, पत्रकार, आदर्श विद्यार्थी या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, पूष्पहार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कांरासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींचे नाव सुचवावे अथवा योग्य व्यक्तींची माहिती फाऊंडेशनेला द्यावी. त्यामध्ये संपुर्ण नाव, पत्ता, जन्मतारिख,  केलेल्या कार्याची संपुर्ण माहिती, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, संपर्क क्रमांक असावेत.

सदर माहिती राज प्रोसेस इक्विपमेंटस & सिस्टिम प्रा. लि., जय गणेश व्हीजन, जय गणेश बिल्डींग, बी विंग, तिसरा मजला, आकुर्डी पुणे या पत्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी फाऊंडेशनेचे उपाध्यक्ष विजयराज पिसे (मोबाईल क्रमांक 9890631732) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mandeva Foundation will soon in Pune Says President Ashokrao Mane