मंगळवेढा : आधार तपासणीमुळे अनेकांचे धाबे दणाणले

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मंगळवेढा - बनावट शिधापत्रिका व त्यातील युनिट शोधण्यासाठी अन्न पुरवठा विभागाने राबविलेल्या आधार मॅपीग तपासणीमुळे तालुक्यातील 47617 कार्डातील 2 लाख आठ हजार 878 लोकांच्या आधार तपासणीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. यात वयोवृध्द नागरिकांचे व लहान मुलाच्या बोटाचे ठसे आधार संलग्न होत नसल्यामुळे त्यांना ऐन दुष्काळात धान्यापासून वंचीत रहावे लागत आहे. तर या तपासणीमुळे दोन ठिकाणावरून रेशनचा बोगस माल नेणारावर मात्र या तपासणीमुळे चाप बसणार आहे.

तालुक्यातील 106 दुकानामधून शिक्षापत्रिकेच्या अंतोदय अन्नपुर्णा अन्न सुरक्षा पिवळे आणि केशरी कार्डधारका स्वस्त धान्य दुकानात धान्य दिले जात असून बनावट शिधापत्रिका व त्यावरील युनिट शोधण्यासाठी शिधापत्रिकेतील युनीट आधारशी सलग्न करण्याचे तालुक्यातील काम समाधान कारक झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानातून अंतोदय, बी.पी.एल, व अन्न सुरक्षा योजनेचा माल नेत असताना कुटूंबाप्रमुखाने या दुकानातील पॉश मशीनवर आधार क्रमांकाशी जुळल्यानंतर माल दिला जात होता. या सर्व योजनेतील 28755 कार्डावरील 1 लाख 37 हजार 974 लोकांना धान्य दिले जात होते.या धान्यापासून अनेक कुटूंबे वंचीत आहेत. सध्या कार्डातील सर्वच युनिटची आधारच्या माध्यमातून तपासणी केली जात असल्यामुळे रेशनचा बोगस माल नेणाय्रावर चाप बसणार आहे पुरवठा विभागाच्या या तपासणीत बोगस कार्डधारक आणि त्यावरील युनिट कमी झाल्यावर या धान्यापासून वंचीत असलेल्या तालुक्यातील 18773 कार्डातील 71254 लोकांना भविष्यात धान्य मिळण्याची शक्यता आहे.

ज्याचे आधार मॅपींग होत नाही त्यानी आधार अपडेट करून घ्यावे तर लहान मुलाना मालासाठी अडवले जात नाही. ज्याने आधार लिंक नसेल त्यानी रास्त धान्य दुकानदाराकडे आधार कार्ड, बॅक पासबुक, गॅस व रेशन कार्ड द्यावे त्यांनाही आधार शी जोडले नाही. यामुळे भविष्यात पात्र लोकाना पुरेसे धान्य मिळेल.
   
- सुधाकर मागाडे निवासी नायब तहसिलदार 
इतक्या युनिटची होणार तपासणी कार्डाचा प्रकार, संख्या आणि युनिट अन्नपुर्णा 73,73 अंतोदय 3693, 19577 अन्नसुरक्षा 24989, 117974 केशरी 15670, 60060 शुभ्र 3103, 11194

Web Title: Mangaldehaa: A lot of people have scared because of the support check