मंगळवेढा : यंदा ज्वारीचे कोठार रिकामेच

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा -  संताची भूमी म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील पुर्व भागातील ज्वारीचे कोठार यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे रिकामी राहिले. या रिकामा काळ्या शिवाराचे केवळ यापूर्वीचे उपकार आपल्यावर आहेत म्हणून शेतकऱ्यांना डोळ्यात अश्रु ढाळत वेळा अमावस्याचे औचित्य साधून पूजा करावी करण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

ज्वारीचे कोठार असलेल्या जिल्ह्यातील तालुक्यातील मंगळवेढा परिसर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, बोराळे, भालेवाडी या परिसरात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पण यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बीची पेरणी करता आली नाही. त्यामुळे यंदा या परिसरात हुरडा पार्टीच्या निमित्ताने येणाऱ्या चाहत्यांना मात्र हा परिसर रिकामपणा पाहण्याची वेळ आली. 

दरवर्षी जिरायत जमिनीत
काहीतरी येत असते पण यंदा काहीच हातात नसताना निराश न होता आजवर या काळ्या आईचे उपकार आहेत म्हणून आज वेळा अमावस्येचे औचित्य साधून पूजा करण्याची वेळ आली. नोकरदार आपल्या अपेक्षांची पूर्ती नाही झाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसतात पण शेतीत निसर्गाने अन्याय केला म्हणून न्याय कोणाला मागायचा ? अशा प्रकारची अपेक्षा न करता केवळ काही शेतीत न काही दिले नाही. म्हणून निराश न होता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी वर्गाकडून सालाबाद प्रमाणे पाच पांडवाची पूजा करून भविष्यातील चांगले उत्पन्न मिळावे ही अपेक्षा करत निराश मनाने साजरा केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com