मंगळवेढा स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु

हुकूम मुलाणी
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले. यासाठी शहरातील लोकांचा तयार केलेल्या व्हीडीओची केंद्र शासनाने दखल घेतली असून, हा व्हिडीओ राज्य शासनाकडूनही स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी वापरला जाणार आहे. त्यासाठीचे बोलणे प्रशासकीय पातळीवरून सुरू झाले. 

मंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले. यासाठी शहरातील लोकांचा तयार केलेल्या व्हीडीओची केंद्र शासनाने दखल घेतली असून, हा व्हिडीओ राज्य शासनाकडूनही स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी वापरला जाणार आहे. त्यासाठीचे बोलणे प्रशासकीय पातळीवरून सुरू झाले. 

नगरपलिकेत सत्ताधारी वि.सत्ताधारी, विरोधक अशी धुसफुस सुरु असताना सर्वसामान्य नागरिक मात्र स्वच्छतेला सहकार्य करीत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नगरपलिकेने केलेल्या आवाहनास लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच पश्‍चिम महाराष्ट्रातील चार जिल्हयातून चौथा क्रमांक मिळाला. यामुळे पालिकेला विकासकामासाठी चार कोटीचा निधीही प्राप्त झाला. या निधीतून शहरात नागरिकांना चांगल्या सोयीसाठी नवीन कामे करण्यात येणार असून, यामुळे शहरात विकासाची व शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कामे होणार आहेत.

आता पलिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 ची तयारी सुरु केली यात पुन्हा नागरिकांच्या सहभागासाठी आवाहन केले आहे. यात सोशलमिडीयात दोन व्हिडीओ येथील स्थानिक कलाकारांना घेवून तयार केले आहेत. हे व्हीडिओ सोशल मिडियातून व्हायरल होत असून त्यास सकारात्मक मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यात घंटागाडीत टाकलेला कचय्राची दुर्गंधी सुटलेली असते आणि सर्वजण नाक धरुन जात असतात. त्यात लहान मुलगी व तिची आई देखील समोर जात असताना आईही नाक धरुन जाते, पण लहान मुलगी स्वच्छतेला सहकार्य करत बंद पडलेल्या घंटागाडीला धक्का देवून मार्गस्थ केल्याचे दाखविले आहे. मुलीला शहराच्या स्वच्छतेची जाण आहे. स्वच्छतेला सहकार्य करा असा व्हिडीओ सोशलमिडीत प्रसारीत होताच स्वच्छ भारत मिशनसाठी हा वापरण्यासाठी राज्य शासनाचा लोगो वापरण्यात पालिकेला विचारणा केली आहे. गतवर्षी या अभियानात पश्‍चिम महाराष्ट्रात चौथा क्रमांक आल्यामुळे लोक सहभागाने त्यास आणखी मदत व्हावी हाच या व्हीडिओचा उद्देश आहे.

दुसऱ्या व्हिडिओत प्रधानमंत्री घरकूल योजनेची उत्तम अशी आशय संपन्न कल्पना साकाराली आहे. अंधश्रद्धेला मुठमाती देवून स्वतला निवारा उपलब्ध झाल्याची माहिती  देणाय्रा व्हिडीओस प्रधानमंत्री सोशल मिडियाच्या साईटवर कौतुकाची थाप मिळाली आहे.

गतवर्षीच्या त्रुटी दुरुस्त करून यंदाच्या वर्षात चांगले काम करून पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी सर्वाच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे. 
- अरूणा माळी नगराध्यक्षा

यंदाच्या वर्षाही स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी गतवर्षी प्रमाणे नागरिकानी सहकार्य करावे. 
- डॉ. निलेश देशमुख  मुख्याधिकारी

Web Title: The Mangalese Clean Survey started preparations for 2019