मंगळवेढा उपसा सिंचन योजना अडकली लालफितीत

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

तालुक्‍यातील पाच गावांचा म्हैसाळ पाणी योजनेत समावेश केल्यावरून दावे दाखल करण्यात आले, परंतु बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मात्र अजूनही लालफितीत अडकला आहे.

मंगळवेढा : तालुक्‍यातील पाच गावांचा म्हैसाळ पाणी योजनेत समावेश केल्यावरून दावे दाखल करण्यात आले, परंतु बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मात्र अजूनही लालफितीत अडकला आहे. तांत्रिक त्रुटी परत आल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रश्नाला मुहूर्त सापडणार नसल्यामुळे या भागातील वंचित ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत 35 गावांचा पाणी प्रश्नावरून लोकसभेवर बहिष्कार टाकून हा प्रश्न चर्चेत आणला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर रिडालोस भारत भालके यांनी या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न करून 2014 च्या अंतिम टप्प्यात  दोन टीएमसी पाणी आणि मंजुरीचे पत्र घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचा जोरावर या भागातील लोक भालके याचा फायदा झाला. परंतु या सरकारने या पाण्याचे पुर्न सर्वेक्षण केल्यानंतर दोन टीएमसी पाणी ऐवजी 1 टीएमसी पाणी शिल्लक राहात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या योजनेत 25 गावा ऐवजी फक्त लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, खुपसंगी, गोणेवाडी, खडकी, नंदेश्वर, भोसे, जुनोणी लेंडवे चिंचाळे या गावाचा समावेश होणार असल्याने कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि त्याबाबतचा प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला.

परंतु या योजनेसाठी ज्या गावांनी आंदोलन केले.  मात्र या योजनेपासून 15 गावे वंचित राहणार आहे त्यामुळे यांना कोणत्या योजनेतून पाणी मिळणार हा प्रश्न देखिल अनुत्तरित आहे दरम्यान तीन महिन्यापूर्वी शिवसेना नेत्या शैला गोडसे यांनी नंदेश्वर येथे मंगळवेढा उपसा योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर  ष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला असून, लवकरच या योजनेस मंजुरी मिळेल असे सूतोवाच केले होते. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास मोजकेच दिवस शिल्लक असताना अजूनही मुहूर्त निघाला नाही. दरम्यान, काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यांचा प्रस्ताव मंत्रालयात सादर झाला नसल्याचा सूर या नेत्याकडून ऐकावयास मिळाला या योजनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही याच मुद्द्यावर यंदाच्या निवडणुकीचा आखाडा गाजणार हे मात्र निश्‍चित झाले आहे.

मंगळवेढा उपसासिंचन योजनेमध्ये शासनस्तरावरून दोन तांत्रिक त्रुटी निघाल्या असून, त्या पूर्ण करण्याचा आदेश मेलवर प्राप्त झाला असून, या त्रुटीची पुर्तता करून दुरूस्त प्रस्ताव सादर करावयाचा आहे. - नारायण जोशी कार्यकारी अभियंता 

नुसता राजकीय व्यासपीठावर तरंगत असणारा या गावाचा गेल्या 35 वर्षापासून पाण्याचा प्रश्न या सरकारच्या काळात सर्वच नेत्याच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागेल अशी अपेक्षा होती.निवडक गावाचा समावेश इतर गावावर अन्याय केल्यास ऐन निवडणूकीत जनआंदोलन उभा करू
- महादेव लोखंडे, कार्याध्यक्ष आर. पी. आय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalveda fast irrigation scheme stuck