मंगळवेढा - एकाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला

हुकूम मुलाणी
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मंगळवेढा -  तालुक्यातील जुनोनी, गोणेवाडी, खुपसंगी या तीन गावच्या हद्दीवर भिमराव हाताळगे (42, रा.खुपसंगी) या इसमाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आले. त्याचे डोके जवळ असलेल्या बोअरमध्ये टाकण्यात आले असून, या प्रकाराने परीसरात खळबळ उडाली. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी तपासाची वेगाने फिरवत अवघ्या चार तासात दोन संशयीताना ताब्यात घेतले.

याबाबतची फिर्याद कुंडलिक मासाळ रा जुनोनी यांनी दिली असून, फिर्यादी आपल्या शेतात गेला असता भुईमुगाच्या पिकात काही जणांची झटापट झाली असावी त्याला संशय आला. इतरत्र पाहणी केली असता त्याच्या शेतातील बोअरच्या पाईपवर व बोअरच्या जवळ रक्त आढळल्याने त्याने बोअरमध्ये डोकावून पाहिले असता त्याला त्यात मानवी शरीराचा एखादा भाग टाकल्याचा संशय आला. या घटनेची माहिती लगतच्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिली. दरम्यान उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, स.पो.नि.महेश विधाते, दत्ताञय पुजारी उपनिरीक्षक शाहूराज दळवी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृत इसम कोण याचा तपास सुरू केला. बोअरपासून काही अंतरावर रक्त पडलेले आढळले व त्या रक्ताच्या काही अंतरावर चुन्याची डबी व चप्पला पडलेल्या आढळल्या. पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने तो बोअरमधील पाईप काढून आतील ते मुंडके बाहेर काढले.

खुपसंगीतील वंदना भिमराव हाताळगे आली हिचा पती  भिमराव रात्री पासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी या महिलेला ज्या ठिकाणी मृत व्यक्तीचा खून करण्यात आला त्या ठिकाणी आढळलेल्या काही वस्तू दाखविल्या असता तिने त्या वस्तू माझ्या पतीच्याच आहेत व काही लोक काल माझ्या पतीला घरातुन घेऊन गेल्याची माहितीही यावेळी सदर महिलेने दिल्याने पोलिसांना हे प्रकरण हाताळण्यास धागेदोरे मिळाली आहेत. सदर मृत व्यक्तिच्या हातावर वंदना व भिमराव असे गोंदन आढळून आले आहे. त्यामुळे मृताची ओळख पटवणे शक्य झाले. सायंकाळ पर्यंत नेमका कुणाचा खून झाला यासाठी परिसरातील नागरिकानी गर्दी केली होती.

Web Title: Mangalveda - One was murdered and the body was thrown in the well