मंगळवेढा - ऑनरकिलींग प्रकरणातील श्रीशैल्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला

हुकूम मुलाणी 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा सोलापूरला नेण्यात आला.

सलगर बुद्रुक येथे अनुराधाचा (पत्नी) अंतविधी केलेल्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा सोलापूरला नेण्यात आला.

सलगर बुद्रुक येथे अनुराधाचा (पत्नी) अंतविधी केलेल्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

विठ्ठल यांची वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी अनुराधा हिने शेतातील सालगडी मुलगा श्रीशैल्य बिराजदार यांच्याशी विजापूर येथे नोंदणी पध्दतीने विवाह केला. हा विवाह वडिलांना मान्य नसल्याने सिंदगी विठठल व सावत्र आई श्रीदेवी यांनी विषारी औषध पाजून मुलिचा खून केला. तिचा ज्या ठिकाणी अंत्यविधी केला त्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. 

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पो.नि.अनिल गाडे, सपोनि वैभव मारकड, उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी शहानूर फकीर घटनास्थळी रात्रीपर्यंत ठाण मांडून होते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनीही भेट दिली. मृत श्रीशैल्यचे आई वडील रात्री नऊच्या दरम्यान आले तो पर्यंत मृतदेह घटनास्थळीच होता. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले श्वान आंधारातून कच्चा रस्त्याने 3.5  कि.मी पर्यंत ही सांगली जिल्हयाच्या सिमेपर्यत असलेल्या उमदी हुलजंती रस्त्यापर्यंत गेले. त्याठिकाणी पाण्याची बाटली, मद्याची बाटली सापडली असून तपासासाठी हे ताब्यात घेतले तर श्रीशैल्यच्या जवळील पिशवीत सुरी, अधिक्षकाकडे तक्रारीचे कागदपत्रे, अन्य कागदपत्रे सापडल्याचे माहिती मिळाली

घटनास्थळापासून काही अंतरावर आत्महत्येशी निगडीत साहित्य सापडले असून, तपासाच्या दृष्टीने ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. शवविच्छेदनानंतर श्रीशैल्यच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
- मनोज पाटील पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण

Web Title: Mangalveda - Shrishalaya's body was sent for the post mortem