मंगळवेढा: 'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेचा रस्ता रोको 

दावल इनामदार
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जाणारी वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जाणारी वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

जय भवानी हौसिंग सोसायटीमध्ये वडार समाजाची घरे आहेत. त्या कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती कमजोर असून ते सोसायटी वरील कर्ज भरू शकत नाही. त्यामुळे जय भवानी हौसिंग सोसायटी वरील संपूर्ण कर्ज माफ करून गरीब कुटुंबाची कर्जातून सुटका करावी. कोल्हापूर – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित कुटुंबाना पर्यायी जागा द्यावी. जय भवानी हौसिंग सोसायटी मधील कुटुंबाना घरकुल योजना त्वरित मंजूर करण्यात यावी. 

जय भवानी हौसिंग सोसायटीमध्ये रस्ता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यावरील दिवे अशी नागरिक सुविधा त्वरित देण्यात यावी. यशवंत राव चव्हाण मुक्त वसाहत योजना त्वरित लागू करण्यात यावी अशा विविध प्रकारच्या मागणीसाठी मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

त्या आंदोलनाला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी, आर पी आय, अशा राजकीय पक्षांनी जाहीर पांठिबा दिला होता. त्याबाबतचे निवेदन मंगळवेढा महसूल विभागाचे मंडल अधिकारी रणजीत मोरे, पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शैला गोडसे, मी वडार महाराष्ट्राचा संघटना प्रदेश समन्वयक आदित्य हिंदुस्तानी, मनसे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार, शहरप्रमुख गणेश धोत्रे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम भोजने, तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे, जालिंदर जाधव, सुरेश पवार, प्रकाश पवार, महादेव धोत्रे, नगरसेवक राहुल सावंजी, तात्या जाधव, तम्मा चौगुले, नितीन दंडवते, अविनाश पवार, राहुल जाधव, अमोल पवार, महादेव मुदगुल, लहू शिंदे, बापू पवार, सतीश मुदगुल, समाधान देवकर, अर्जुन देवकर, गुलाब देवकर, भैया पवार, दादा पवार, श्रीकांत पवार, नारायण गोवे, किरण घोडके व इतर वडार समाज कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalveda: Stop the road from the organization of 'Wadar Maharashtra'