मंगळवेढ़यात राष्ट्रवादी पक्षाची धुस-फुस कायम 

मंगळवेढ़यात राष्ट्रवादी पक्षाची धुस-फुस कायम 

ब्रह्मपुरी (सोलापुर) - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. तरी मंगलवेढा तालुक्यातील पक्षाची कार्यकर्त्यांची धुस-फुस कायम असून, पक्षाने प्रलंबित असलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवड़ी शहा गटास विस्वासात घेतले नसल्यामुळे निवडी केल्या गेल्या. परंतु मंगलवेढा तालुका राष्ट्रवादी पक्षाला मानणारा मतदारसंघ असून, तालुक्याने माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राम साळे यांना मताधिक्य देऊन निवडून आणले होते. 

त्यामधे शहा गटाचे मोठे योगदान असून तिसरी पिढीचीहे पक्षास अजुनही पाठबळ आहे. परंतु, २००९ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या समन्वयामुळे बालेकिल्ल्यातील बुरुज ढासळल्याने राष्ट्रवादी पीछेहाट झाली होती. २०१४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकवार फेकली गेली. त्यानंतरही पक्षाने नगरपालिका व ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण केले. सध्या पक्षाकडे नगरपालिका, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशी सत्तास्थाने असून कोट्यावधीची निधी आणूनही विविध विकास कामे करण्यासाठी अडचणी, अंतर्गत हेवे दावे यामुळे  नगरपालिकाचा विकास कामे खुंटला असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील विकास कामाला खीळ बसली. विविध विकास कामांच्या ठेकेदारीतुन भ्रष्टाचार पोखरला असून जनता संताप व्यक्त करत आहेत. तालुका व शहरातील  पक्षाच्या पदासाठी पक्षाचे अंतर्गत वाद वाढत गेले असून जुन्या नव्या कार्यकार्त्यांचा ताळ मेळ नसल्यामुळे 'तू तू मै मै' च्या  होत आहे. याचा फटका पक्षाला बसण्याची चिन्ह आहेत. मागील दोन महिन्यपूर्वी तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडीनंतर मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीपक्षाचे शहराध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, तालुकाध्यक्ष सुनील डोके, जिल्हा सरचिटणीस लतीफ़ तांबोळी, नगरसेवक बशीर बागवान यांनी भेट घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुक,पक्षबांधनीस कामाला लागण्याचे मोलाचे संदेश दिले.

त्यानंतर 'हम भी किसी से कम नही' म्हणत दुसऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या गटाने वेळ साधुन बारामती येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रतिंक सदस्य पी. बी पाटील, राहुल शहा, नगराध्यक्ष अरुणा माळी, भारत पाटील,काशीनाथ पाटील, रामेश्वर मासाळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील धुस- फुस , मी मोठा का तु मोठा व वाद चव्हाट्यावर आणला. त्यामुळे दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यना एकजुटीने पक्ष वाढीस काम करण्याचे मोलाचे सन्देश दिला असला तरी पक्ष श्रेष्ठिनी योग्य वेळी दखल घेऊन दोन्ही गटास समजोता केल्यास धुस फुस थाम्बली जाइल.  नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात  राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिल्यास पक्षास फटका बसन्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com