मंगळवेढा : पक्षापेक्षा गटा-तटाचे राजकारण जास्त

दावल इनामदार 
गुरुवार, 22 मार्च 2018

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यामधे २००९ च्या विधानसभा निवडणूकीपासून आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षाचे अस्तित्व कमी असून त्यापेक्षा गटा तटाचे राजकारण अधिक प्रभावी होत असल्याचे दिसून येत आहे.    

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यामधे २००९ च्या विधानसभा निवडणूकीपासून आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षाचे अस्तित्व कमी असून त्यापेक्षा गटा तटाचे राजकारण अधिक प्रभावी होत असल्याचे दिसून येत आहे.    

२००९ मध्ये राष्ट्रवादीचे पानीपत होऊन अपक्ष आ. भालके विजयी झाले. यापूर्वी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, आमदार राम साळे यांनी राष्ट्रवादी पक्षाची ग्रामीण, शहरी भागात चांगली मोट बांधली होती. म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व होते पण ही पकड अलिकडच्या काळात ढिली झाली. सध्या स्थितिला विद्यमान आमदार भारत भालके काँग्रेस पक्षाचे असले तरी त्यानी राज्यातील सत्ता बदलानंतर प्रांत कार्यालयावरील मोर्चा वगळता आंदोलन ,मोर्चे,पक्ष वाढ़ीसाठी प्रयत्न केलेली दिसत नसून वैयक्तिक गट निर्माण करुण आपला दबदबा निर्माण करुन जनमानसत ते लोकप्रिय झाले असून भालके गटाची ताकद झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दिसली.

तसेच मागील निवडणुकीत दामाजी शुगरचे अध्यक्ष समाधान अवताड़े यांनी शिवसेना या चिन्हावर निवडणूक लढवली असली तरी त्यांनी या पक्षपासून सौ हात दूर राहुन भाजपाशी जवळीक साधली गेली. परंतु अद्यापही त्यांचा मोदी लाटेतही पक्ष प्रवेश झालाही नाही. शिवसेना पक्षावर निवडणूक लढवुनही त्यांनी शिवसेना पक्षासाठी कोठेही आंदोलने, मोर्चे, पक्षाला वाढ होईल असे प्रयत्न केले गेली नाही. वैयक्तिक त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमधे शिवसेना पक्षाचे उमेदवार न देता बहुतांश ग्रामपंचायत आवताडे गटाचे असल्याचे दाखवुन दिले.

विधानसभा निवडणूक शिवसेना चिन्हावर लढवली असली तरी त्यानी पंचायत समिती, जिल्हा परिषद् निवडणूकामधे घवघवित यशानंतरही पंचायत समिती, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पद आवताडे गटाने ताब्यात घेतले गेले. विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक भाजपचे सहयोगी आमदार असले तरी त्यांनीही भाजप पक्षवाढीसाठी कोठेही बांधणी केली नाही.

वैयक्तिक आपल्या गटाचा ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकामधे दबदबा निर्माण करुण विविध सहकारी संस्थाच्या माध्यमातुन आपल्या गटाचे जाळे निर्माण केले आहे. त्यांना मानणारा वर्ग आहे. राज्यातील सत्तेचा देखील त्यांना लाभ तालुक्यासाठी घेता आला नाही. राष्ट्रवादी पक्षाने तालुक्यातील ग्रामीण भाग वगळता शहरापुरती नगरपालिका ताब्यात घेऊन पक्षाचे वर्चस्व आहे. हे राहूल शहा नेतृत्वाने दाखवून दिले.

दोन विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या पक्षाने अजूनही ग्रामीण व शहरी भागामधे मेळावा, पक्षाच्या शाखा, शिबिर, सामाजिक कार्यक्रम असे केलेली नसून नावापुरते पक्ष असलेले वाटू लागले आहेत. त्यामधे राजकीय गट तट, भावबंधकी, चढाओढ, हेवेदावे यामुळे पक्षाच्या बांधणीसाठी अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली नाही.

तेच कार्यकर्ते, तेच पद, यामुळे नविन युवकाना संधी मिळणे अजुनही कठीण झाले आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी पक्ष विधानसभा  निवडणुकांमधे पक्षाच्या चिन्हावर लढवली असली तरी पक्षवाढीसाठी प्रत्येक राजकीय नेत्यांनी आप आपली गटाची ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात पक्षापेक्षा स्थानिक नेत्यांची गट सक्षम असल्याचे चित्र दिसत आहे. यापुढे होणाऱ्या निवडणुकांमधे पक्षाचे धोरणे काय असतील हे येणारा काळच ठरवेल.

Web Title: mangalwedha have group politics major than party politics