मंगळवेढा - शहरातील विविध प्रश्‍नाबाबत पालिकेचे दूर्लक्ष

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 27 जुलै 2018

मंगळवेढा - शहरातील विविध प्रश्‍नाबाबत पालिकेने केलेल्या दुर्लक्षाबाबत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पालिकेच्या मुख्यव्दारास कुलुप ठोकण्यात आले. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी देण्याची सोय करून बनावट कागदपत्रे देवून ठेका मिळवलेल्या ठेकेदारावर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या लेखी पत्राने हे आंदोलन स्थगीत करण्यात आले.

सायंकाळच्या दरम्यान झालेल्या या आंदोलनात जनहित शेतकरी संघटना राज्य संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंडले, तालुकाध्यक्ष दामाजी मोरे, शहराध्यक्ष पप्पू दत्तू, कार्याध्यक्ष बलभिम माळी, तालुका संपर्कप्रमुख दाजी कोंडूभैरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

पालिकेत ठेका मिळवून कोटी रुपये मिळवले याबाबत नगरपालिकेच्या बारा ते तेरा नगरसेवकांनी याबाबत ठराव करूनही याबाबत गुन्हा दाखल करण्यास मुख्याधिकार्‍यांनी दोन महिने झाले तरी गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणी प्र.मुख्याधिकारी यांची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नगरपालिकेला उद्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा. प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता राखली पाहिजे. ज्या नगरपालिकेच्या शाळेसाठी पुरीत संरक्षण भिंत बांधावी आणि त्या विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी या मागणीवरुन हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: mangalwedha - municipal corporation needs to look into city's problem