'राष्ट्रवादीच्या गतवैभवासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करा'

NCP
NCP

मंगळवेढा : 2009 पासून मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या ढासळलेल्या बुरूजाबाबत तालुका पातळीवरील राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती समजून घेत पक्षाच्या तालुक्यातील गतवैभवासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनिल डोके, शहराध्यक्ष अजित जगताप, नगसेवक बशीर बागवान,लतीफ तांबोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी मुंबईत सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी भेट घेतली असता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडीत काम न केलेल्याना बाजूला नव्याला संधी देण्यात आल्यावर पक्षातून काही पदाधिकारी मंडळी नाराज असल्याची धुसफुसत बाहेर आली. त्यावर पवारांनी नव्याला संधी दिली पाहिजे.

राज्यात सर्वत्र विदारक परिस्थिती आहे शेतकरी कामगारव्यापारी सगळे घटक शासनाच्या धोरणाने सरकारी व्यवस्थेने हैराण आहेत मराठा धनगर मुस्लिम लिंगायत कोळी सह समाज आपल्या हक्काच्या मागण्यासाठी मोठा लढा उभा करत आहे. घटनेत दुरूस्ती करुन त्याना तात्काळ न्याय मिळवून द्यावा लागेल या विषयी पक्षाची भुमिका साहेबानी सांगितली आणी तुम्ही यावर सर्व सामान्या सोबत रहा असा आदेश देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका निवडीपासून ते पक्षाच्या धेयधोरणा बाबत या बैठकीत चर्चा  करत. प्रदेशाध्यक्षा जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे ,खा विजयसिंह मोहिते पाटील ,जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांच्या उपस्थितीत तालुक्यात मेळावा घेण्याविषयी चर्चा झाली. शहराच्या विकासाबाबत नवीन काय काय योजना याबरोबर तालुक्यात पीकपाणी व  पाऊस व  बागायत क्षेत्राविषयी खा.पवार  आस्थेवाईकपणे माहिती घेतली.

एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला तालुका आजही पवार साहेबावर प्रेम करत आहे मात्र पक्षिय पातळीवर जाऊन संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणुन ही भेट घेतली.
- अजीत जगताप, शहराध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com