मंगळवेढा - देवदर्शनासाठी गेलेल्या एका विहिरीत पडून मृत्यु

हुकूम मुलाणी
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - तालुक्यातील हुलजंती येथील ओढयात असलेल्या ग्रामपंचायतच्या विहीरीतील पाण्यात बुडून कोल्हापूरातील मेंढपाळ म्हाळू सिध्दाराम खिलारे (वय 40 रा.मुरगुड ता कागल जि.कोल्हापूर) याचा मृत्यू झाला.

याबाबत या घटनेची माहिती अशी की, आमवस्या असल्याने हुलजंती येथे म्हाळू सिध्दाराम खिलारे महालिंगराया देवाच्या दर्शनासाठी गेले होते. ते घरी परत आले नसल्यामुळे त्यांचा शोध घेतला असता, आज सकाळी बंधाऱ्याजवळ असलेल्या विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत कृष्णा सिध्दाराम खिलारे यांनी माहिती दिली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: mangalwedha one dead, drowned in a well