मंगळवेढा : 28 गावे व वाड्यावस्त्यावर राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सुरु

khandekar.
khandekar.

मंगळवेढा - तालुक्यातील 28 गावे व वाड्यावस्त्यावर कायम स्वरूपात पाणी योजनेबाबत राष्ट्रीय पेयजल योजनेतून 11 कोटी 50 लाखांचा आराखड्यातील काही कामे सुरू झाली आहेत. उर्वरित लवकरच सुरू होणार आहेत. 48 गावे व 560 वाड्यावस्त्यावरचा टंचाई आराखडा जिल्हा परिषदेला सादर केला असल्याची माहिती सभापती प्रदीप खांडेकर यांनी दिली.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्याची तीव्रता लवकरच जाणवू लागल्याने पंचायत समिती प्रशासनाने त्याचे आतापासूनच नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सभापती प्रदीप खांडेकर यांनी संबंधित विभागाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्रादेशिक पाणी पिण्याचे पाणी हे गावठाणातील लोकांना मिळत आहे. पण शेतीमुळे गावठाणातील बहुसंख्य लोकांचे स्थलांतर हे वाड्या वस्त्यावर झाले असल्यामुळे वाड्या-वस्त्या वरील लोकांना यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठी शासनाकडे त्याठिकाणी असलेले लोकसंख्येची माहिती घेवून त्या ठिकाणी कायमस्वरूपी योजना राबविण्यासाठीचा आराखडा शासनास सादर केला.

त्यानुसार बावची, चोखामेळा नगर ,दामाजी नगर, गुंजेगाव, हाजापुर, जुनोनी, कचरेवाडी, खडकी, मल्लेवाडी, मारोळी, मुढवी, तांडूर, आरळी, बोराळे, चिक्कलगी, मरवडे, मुंडेवाडी, उचेठाण, देगाव, भोसे, तळसंगी हिवरगाव, ढवळस, धर्मगाव, भाळवणी, रहाटेवाडी, भाले वाडी आदी गावातील असणाऱ्या गावठाण व वाडी वस्ती चा यात समावेश आहे. यामधील काही गावांचे अंदाजपत्रक प्रगतीत आहेत. तर काही गावांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्या गावांचे आदेश प्राप्त झाले आहेत त्या गावात कामे सुरु करण्यात आलेली आहेत. सदरच्या आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेली कामे हे सन 2018-19 च्या आराखड्यात मंजूर केली आहेत. तर काही गावातील कामे पुरवणी आराखड्यात समाविष्ट केली आहेत. त्यानुसार शासनाकडे सादर केली. 

शासनाकडून या आराखड्यास मंजुरी मिळताच या गावात प्रस्तावित केलेली कामे केली जाणार आहेत त्यानुसार वाड्या-वस्त्या वरील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती सभापती प्रदीप खांडेकर यांनी दिली. याशिवाय राहिलेल्या गावाचाही यामध्ये समावेश करून तो आराखडा जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करून मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com