पोलिसांच्या प्रश्नाकडेही लक्ष हवे

हुकूम मुलाणी
शनिवार, 24 मार्च 2018

मंगळवेढा - येथील पोलिस ठाण्याला सरंक्षित भिंत नसल्याने कारवाईत जप्त केलेली वाहने व अन्य मालमत्ता उघडयावर असून, पोलिसांची रिक्त पदे व कामावरील ताण पाहता पोलिस ठाण्याच्या आवाराला सरंक्षित भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. परंतु, शासनाचे याकडे दुर्लक्ष केले आहे.

मंगळवेढा - येथील पोलिस ठाण्याला सरंक्षित भिंत नसल्याने कारवाईत जप्त केलेली वाहने व अन्य मालमत्ता उघडयावर असून, पोलिसांची रिक्त पदे व कामावरील ताण पाहता पोलिस ठाण्याच्या आवाराला सरंक्षित भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. परंतु, शासनाचे याकडे दुर्लक्ष केले आहे.

मंगळवेढा तालुका हा महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर असल्याने पोलिसांना या सिमावर्ती भागात अवैध व्यवसायामुळे वारंवार कारवाईसाठी सतर्क रहावे लागते. या दरम्यान झालेल्या कारवाईत वाहनासह अन्य ऐवज पोलिसांच्या हाती लागत असतो. शिवाय पूर्व भागात असलेल्या भिमा नदीच्या पात्रातील वाळू चोरीवर कारवाई करताना सिध्दापूर व तांडोर येथे झालेल्या कारवाईत मोठया प्रमाणात वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनाबरोबर यात असणारी वाळू, शिवाय अपघाताग्रस्त वाहने देखील पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावली जातात. मंगळवेढा आगारात वाळू चोरीतील वाहन सुरक्षा असताना चोरुन नेण्यात आला. पोलिस ठाण्याच्या समोरच पंढरपूर मंगळवेढा रस्ता असल्यामुळे कारवाईत जप्त केलेली वाहने व ऐवजाची आंधाराचा गैरफायदा घेवून चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ऐवजाची सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीने पोलिस ठाण्याच्या समोर व मागील बाजूस सरंक्षित भिंत असणे आवश्यक आहे. सध्या पोलिसांची असलेली रिक्त पदे व कामावरील ताण पाहता यांचे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा भिंत नसल्यामुळे ऐवज चोरीस गेल्यावर यांचा हकनाक वरिष्ठाडून बळी होण्याची वेळ पोलिसावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पोलिस अधिकाऱ्याला शासकीय निवासस्थान नाही, निवडणुक व अन्य कालावधीत बंदोबस्त असलेल्या पोलिसांची निवासाची गैरसोय होत आहे. जनतेच्या रक्षणाची अपेक्षा पोलिसाकडून आपण करतो. परंतु, त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत मात्र सर्वच जण मौन बाळगून आहेत

लोकसंख्येचा वाढलेला विस्तार व कामावरील ताण पाहता  सरंक्षित भिंत, अधिकारी व पोलिसांसाठी निवासस्थान, जयंती-यात्रा कालावधीत बंदोबस्तासाठी आलेल्याच्या सोयीसाठी हॉल याची पोलिस ठाण्याला आवश्यकता असून, याची पुर्तता तात्काळ होणे आवश्यक आहे.
-अजित जगताप सदस्य शांतता कमिटी

Web Title: mangalweha police solapur news