माणगंगा पाण्यासाठी आसुसलेलीच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

गोंदवले - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असला तरी पूर्वेकडील माण तालुक्‍यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. परिणामी माण नदी अजूनही पाण्यासाठी आसुसलेलीच दिसते.

सातारा जिल्ह्याच्या वेगळेपणात निसर्गानेही वेगळेपण जपले आहे. पश्‍चिमेकडे पावसाची संततधार, तर पूर्वेकडे प्रतीक्षाच अशी भिन्न स्थिती दरवर्षीच पाहायला मिळते. राज्यात सर्वत्रच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. परंतु, माणमध्ये त्याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. 

माणमध्ये अपवाद वगळता अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठे कोरडेच आहेत. नेहमीच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी यंदा जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. परंतु, त्यामध्ये पाणीसाठा होण्यासाठी पावसाची गरज आहे. तालुक्‍यातून वाहणाऱ्या माण नदीवर जागोजागी बंधारे बांधण्यात आले असल्याने पूर्वीप्रमाणे संपूर्ण नदी वाहणे आता दुर्लभ बनले आहे. मात्र, नदीपात्रातील बंधारे भरण्याइतका पाऊसही झालेला नाही. सध्या तरी पावसाअभावी नदीसह अनेक पाणीसाठे कोरडेच दिसतात.

खरीप बाजरीसह मुगाला जीवदान
बिजवडी : परिसरात पडलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी व मूग या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांनी थोड्याफार पावसानंतर धुळवाफेवर पिकांच्या पेरण्या केल्या. पिके चांगली आल्यानंतर त्याची कोळपणी, खुरपणी 
करून घेतली. मात्र, नंतर पावसाने विलंब केल्याने पिके जळून जाण्याच्या मार्गावर 
होती. मात्र, नुकत्याच पडलेल्या रिमझिम पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले 
आहे. अजून एखादा हलका पाऊस झाला तरी मुगाचे विक्रमी उत्पादन निघेल. बाजरीसाठी दमदार पावसाची गरज आहे. मुगाला दर चांगला मिळत असल्याने बाजरीपेक्षा मूग पेरणीकडेच बहुतांश शेतकरीवर्गाचा कल वाढलेला दिसून येत आहे.

Web Title: Manganga river water rain