मंगळवेढा : भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यु

accident
accident

मंगळवेढा - मंगळवेढा ते सोलापूर रस्त्यावरील टोल नाक्यावर चहा पिण्यासाठी आई वडीलासमवेत थांबलेल्या पाच वर्षे वयाच्या गजरी संतोष जाधव (वाशी ता. भुम जि. उस्मानाबाद) या चिमुकलीचा भरधाव अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला.

ऊस तोडणीसाठी आलेल्या जाधव कुटुंबीय गाळप हंगाम संपून गावाकडे परतत असताना मंगळवेढा शहरानजीक असलेल्या टोल नाक्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर वाहन जागेवर न थांबताच भरधाव फरार झाले. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते कर्मचारी समवेत दाखल झाले असून, अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यासाठी पंढरपूर सांगोला येथे नाकाबंदी करण्यात आली. रात्री उशिरा अज्ञात वाहनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com