मंगळवेढा : पालिकेचा कारभार प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवर 

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - येथील नगरपलिकेचे मुख्याधिकारी रजेवर गेल्यामुळे पालिकेचा कारभार सध्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवर सुरु असून, त्यातच सत्ताधाऱ्यांतील धुसपुस यामुळे संतनगरीचा लौकीक असलेल्या शहराच्या विकास कामावर परिणाम झाला आहे. नगरपालिकेत नगरसेवक, सत्ताधारीतील दुफळी कधी संपणार याकड़े शहरवासियांचे डोळे लागले आहेत.

मुख्याधिकारी डॉ. निलेश देशमुख दिर्घ रजेवर गेल्यामुळे सांगोला नगरपालिका मुख्याधिकारी प्रभारी पदभार देण्यात आला तिथेच कार्यभार पुर्णवेळ पाहत असल्याने मंगळवेढयात पुर्ण क्षमतेने अधिकारी नसल्याने यातून शहराच्या विकासाचा खेळ खंडोबा होत चालला आहे. जुलै अखेरीस कोरम अभावी सभा रद्द करावी लागली वास्ताविक पाहता जनतेने प्रभागातील कामे व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी नगरपलिकेत पाठविले नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी समन्वय साधून शहराचा विकास करणे आवश्यक आहे. राज्यात सत्ता आणि पालिकेतील सत्ता ही विरोधी गटाची असली तरी शहरावासीयांना मात्र विकास हवा आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील दलित वस्ती सुधारणा कामासाठी दरवर्षी लाखो रुपये निधी उपलब्ध करून सुधा कामे करण्यास वैयक्क्तीक देव्शापोटी डावलले जाते आहे असे आरोप करण्यात आला. 

सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी वचन नाम्यापासून दोन गट निर्माण झाल्याने दुरावत चालल्याचे दिसत आहेत.

शहरातील नागरिकांना या वादाचा कंटाळा आला असुन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समनवयाच्या अभावमुळे या पालिकेची कारभार कायम चर्चेत राहत आहे. ठेकेदाराने केलेल्या कामातील विलंब, नगरसेवकासह कर्मचाय्राला केलेली दमदाटी भाड्यापोटी 11 लाख व कामातील विलंब दंड 23 लाखाचे पालिकेचे नुकसान झाले. नगरपालिकेची पाणी व्यवस्था वापरत 6 लाख रू पाणीभाड़े थकवले असून, ठेकेदाराला कामास केलेल्या विलंबाबद्दल दंड आकारणी, ठेकेदार यांनी बनावट कागदपत्रे देवून पालिकेची फसवणूक केल्याबद्दल जनहीत शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन करण्यात आले.

बसवेश्‍वराच्या स्मारकाबरोबर इतर संताची महती वाढविण्यासाठी एकदिलाने प्रयत्न केल्यास तालुक्याचा लौकीक भविष्यात वाढणार आहे. शहरातील जनतेने दिलेल्या करातून रस्ते आरोग्य स्वच्छता या सुविधा चांगल्या प्रकारे कशा देता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी मोठे सहकार्य पालिकेला केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये गुणांकनावर आघाडीवर असलेली पालिका अचानक मागे राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com