मंगळवेढा : बेडशीटचा वापर करुन आरोपीने कारागृहावरून पलायन

हुकूम मुलाणी
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मंगळवेढा - येथील आरोपीने कारागृहावरून बेडशीटच्या तुकड्यांच्या सहाय्याने उडी टाकत, चार पोलिसांच्या सुरक्षिततेला चकवा देत पळ काढला. दरम्यान या फरार आरोपीच्या शोधासाठी तीन पथकाची नियुक्ति केली असल्याचे सांगण्यात आले आले. आरोपीनेच पोलिसांच्या सुरक्षेचे धिंडवडे काढल्याने मंगळवेढा पोलिसांचे लागलेले बदनामीचे ग्रहण मात्र सुटेना, अशी परिस्थिती आहे.

माळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील खून प्रकरणातून 2012 पासून आरोपी दादा दिगंबर लेंडवे (वय 46) कारागृहात आहे. सोमवारी पहाटे 5 च्या दरम्यान शौचालयाला जाण्याचा बहाणा करून बेडशिटचे तीन तुकड्याची गाठ मारून त्याने सबजेलच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. आरोपी पळून जात असताना सुरक्षिततेसाठी नेमलेले पोलिस काय करत होते असा सवाल निर्माण झाला आहे.

तर प्रतिक शिवशरणच्या हत्येप्रकरणात आरोपीची अटक व पोलिस निरीक्षक वरील कारवाईसाठीची जनहीत शेतकरी  संघटनेच्या वतीने 24 दिवस वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करून मंगळवेढा पोलीसांच्या कामाबाबत लक्ष वेधले होते. पण या प्रकरणात स्वत पोलिस अधिक्षकांनीच लक्ष घालून संशयीत आरोपी ताब्यात घेतले. आता आरोपीच्या पलायनाने पोलीसाकडून आरोपीस असलेल्या सुरक्षिततेचा गलथान कारभार समोर आला असून, कोणत्याही प्रकरणात चर्चेत राहण्याची मंगळवेढा पोलीस परपंरा पुन्हा एकदा कायम राहिली.

फरार आरोपीच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. लवकरच त्याला अटक केली जाईल. या प्रकरणाबाबत चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल. 
- मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, सोलापूर 

Web Title: Manglveda: The accused escaped from jail using bedsheets