कान्होपात्रेच्या उत्कट भावानुभवाच्या दर्शनाने साकारलेली मंगळवेढा ही संतभूमी आहे- किर्ती शिलेदार

kirti
kirti

मंगळवेढा - येथील संत कान्होपात्रा यांच्या भूमिकेतून मला अध्यात्माची अनुभूती आली. त्यामुळे कान्होपात्रेच्या उत्कट भावानुभवाच्या दर्शनाने साकारलेले मंगळवेढा अध्यात्मिक गाव असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. कान्होपात्राच्या मूर्तीचे आनावरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, नगराध्यक्षा अरुणा माळी, पक्षनेते अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे, प्राचार्य एन बी.पवार राजश्री टाकणे, प्रवीण खवतोडे, बी.टी पाटील, सिद्राम यादव, धनश्री परिवाराच्या शोभा काळुंगे, शुभदा पटवर्धन, हजरत काझी, विजृय शिंदे, आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ, रतन पडवळे, भालचंद्र पटवर्धन, आदी मान्यवर उपस्थित होते. 

कान्होपात्राच्या अभंग शिल्पाचे व स्मारकाचे अनावरण अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कीर्ती शिलेदार, ह-भ-प भगवती महाराज सातारकर, लोककलावंत चंदाताई तिवाडी, यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना भगवती महाराज सातारकर म्हणाल्या की भक्ती ही स्त्रेण्य आहे. व्यक्त होते ती व्यक्ती स्त्री. ती व्यक्त होते आणि जगाला घडवते. संत कान्होपात्रा यांचे विचार परंपरेत संत कवयित्री आहेत. जगाला आज विषयाचे वेड आहे. मंगळवेढा हे मांगल्याचं वेड असालेलं गाव आहे. आणि इथे अध्यात्माचं वेड आहे. भक्ती आणि विचाराचं वेड आहे. 
उपस्थितांचे स्वागत शकुंतला पुजारी यांनी तर प्रस्ताविक आप्पासाहेब पुजारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सावंत यांनी केले तर आभार माने यांनी मानले कार्यक्रमासाठी पुजारी परिवार, घारगे परिवार, वारी परिवार आदींनी परिश्रम घेतले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com