पतंगाचा मांजा पक्ष्यांच्या जीवावर 

sangali
sangali

सांगली : इमारतीच्या गच्चीवर, मोकळ्या जागेत पतंग उडविण्याची हौस पक्ष्यांसाठीही मृत्यूचा सापळा ठरत आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांच्या कालावधीत जवळपास शेकडो पक्षी जखमी होतात, तर अनेक पक्ष्यांना जीवही गमवावा लागतो. चिनी नायलॉन मांजावर बंदी असली, तरीही या मांजाची सर्रास विक्री होत असून, त्यामुळे पक्ष्यांचा जीव जाण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. 
दोन दिवसांपूर्वी मिरजेत तपकिरी मत्स्य घुबड आमि बोलनेलीचा गरूड हे मांज्यात अडकून जखमी झाले होते. त्यांना प्राणीमित्रांनी जीवदान दिले.

त्यापाठोपाठ येथील मराठा समाज भवनजवळ पारवा जातीचा पक्षी मांज्यात अडकून जखमी झाला होता. सचिन पलंगे या सजग नागरीकांना तत्काळ प्राणीमित्र अजित काशीद यांना कळविले. त्यानंतर तातडीने मंदार शिंपी, योगेश विधाने, सचिन शिंगारे, राहूल माळी यानी पक्ष्याला उपचार करून निसर्गात मुक्त केले. 

जानेवारीपासून मार्च-एप्रिलपर्यंत जागोजागी पतंग उडविणारे दिसून येतात. शहरांत पतंग उडविण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. पतंग उडविण्याचा काहींचा आनंद इतरांसाठी मात्र जीवघेणा ठरत असल्याचे निदर्शनास येते. चिनी नायलॉन मांजावर बंदी असली, तरीही या मांजाची सर्रास विक्री होते. हा मांजा तुटण्यासाठी कठीण असल्याने तो पंखात अडकला की पक्ष्यांना तो चोचीने तोडता येत नाही. अनेकदा विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या या दोऱ्यांमध्ये अडकून तडफडून पक्ष्यांचा मृत्यू होतो, तर काही वेळेस पक्षी गंभीर जखमी होतात. चायनीज मांजावर बंदी असल्याने नागरिकांनी पतंग उडविण्यासाठी पारंपरिक मांजा वापरावा, असे आवाहन प्राणीमित्रांनी केले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com