भोंदूकडून युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कोल्हापूर - कौटुंबिक त्रासापासून मुक्तता करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी धार्मिक विधीचा बहाणा करत भोंदूबाबाने युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मनोज मधुकर नरके ऊर्फ नरके बाबा (वय ५०, रा. छत्रपती कॉलनी, सागरमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी (ता. १) घडलेल्या या प्रकाराची फिर्याद आज संबंधित पीडित युवतीने जवळच्या पोलिस ठाण्यात दिली.

संबंधित युवती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिची घरची परिस्थिती बेताची आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती स्पर्धा परीक्षेचा  अभ्यास करत आहे; मात्र यशाबाबत तिच्या मनात भीती होती. त्यातच घरात कौटुंबिक कारणातून 
वाद होत होते. या सर्व प्रकारामुळे संबंधित युवती गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. यातून बाहेर पडण्याचा सल्ला तिने मैत्रिणीला विचारला. तिने तिला नरके बाबाबद्दल माहिती देत तो कुंडली पाहून उपाय सांगतो, असे सांगितले. पीडित युवतीने मैत्रिणीशी संपर्क साधून आज त्या बाबाकडे जाऊया, अशी विनंती केली. मात्र मैत्रिणीने आज वेळ नसल्याचे सांगितल्याने संबंधित युवती एकटीच बाबाकडे गेली. 

युवती घरी गेली; तेव्हा बाबा तिच्या मुलीला सोडण्यासाठी बाहेर जात होता. त्याने युवतीला काही वेळ थांबण्यास सागितले. काही वेळाने तो परत आला. त्याने युवतीला बैठकीच्या खोलीत बोलावून तिची माहिती घेतली. तिने समस्या सांगितल्यानंतर नरकेने या समस्या दूर करण्यासाठी एक विधी करावा लागेल. त्यासाठी तुझ्या शरीरावर काही खुणा कराव्या लागतील, असे सांगितले. युवतीने घाबरून नकार देत तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र नरके बाबाने तुला काही करणार नाही, असा दावा करत तिला साखर खायला दिली. थोड्या वेळाने युवतीला गुंगी येत असल्याचे पाहून त्याने युवतीच्या शरीराशी लैंगिक चाळे करत अत्याचाराचा प्रयत्न केला; मात्र युवती वेळीच भानावर आली. तिने घाबरून तेथून पळ काढला. 

तिने याबाबत मैत्रिणीला संगिताच तिने तिला पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याकडे आणले. श्री. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ नरके बाबाला ताब्यात घेतले. त्याच्यावर विनयभंग तसेच जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली. 

Web Title: Manoj Narake arrested