मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जीवनगौरव; "सकाळ'चे संजय पाठक यांना विशेष साहित्य पुरस्कार
सोलापूर - राज्यस्तरीय मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा डॉ. द. ता. भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. कोल्हापूर येथील प्रा. चंद्रकुमार नलगे यांना "साहित्य जीवनगौरव' पुरस्कार देण्यात येणार असून, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली व पुणे येथील सुशील धसकटे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार, विशेष साहित्य पुरस्कारांची घोषणा या वेळी करण्यात आली.

पुरस्काराचे वितरण येत्या 25 रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवछत्रपती रंगभवन सभागृहात येथे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार असून, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. साहित्य जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह; तर मनोरमा राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप 10 हजार पाचशे रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे.

कविता बॅंकेतर्फे मनोरमा जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कारासाठी सुरेखा शहा व डॉ. महेंद्र कदम यांची निवड करण्यात आली आहे. मनोरमा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे मनोरमा जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार निर्मला मठपती व गोविंद काळे यांना देण्यात येणार आहे.

'सकाळ'चे संजय पाठक यांना पुरस्कार
स. रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा विशेष साहित्य पुरस्कार (साहित्य व पत्रकारिता) "सकाळ'चे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांना देण्यात येणार आहे; तसेच काका विभुते व पद्माकर कुलकर्णी यांचीसुद्धा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Web Title: manorama sahitya award declare