मोरासह अनेक पक्षांच्या मृत्युने खळबळ

कुलभूषण विभूते
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

वैराग : मालेगांव(आर) ता. बार्शी येथील शिवारात राष्ट्रीय पक्षी मोर यासह लांडोर, तितर, लाहोर, भारद्वाज, होलार, सातभाई होला अशा 25ते 30 पक्षांचा मृत्यू झाला. यामध्ये आकरा वन्य प्राणी व पक्षी यांचे मृतदेह सापडले आहेत. या वन्य प्राणी पक्षांचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वैराग : मालेगांव(आर) ता. बार्शी येथील शिवारात राष्ट्रीय पक्षी मोर यासह लांडोर, तितर, लाहोर, भारद्वाज, होलार, सातभाई होला अशा 25ते 30 पक्षांचा मृत्यू झाला. यामध्ये आकरा वन्य प्राणी व पक्षी यांचे मृतदेह सापडले आहेत. या वन्य प्राणी पक्षांचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत पक्षांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तपासणीसाठी पुणेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. ही घटना शनिवारी 4 ऑगस्टला सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी सोलापूर जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी संजय माळी, बार्शीचे तहसिलदार ऋषीकेत शेळके, बार्शी वनपरिक्षेत्र अधिकारी शामराव सातपुते, वैराग वनपाल सिमा मगर, वैराग वनसंरक्षक सुनिल थोरात, बार्शी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवाजी कांबळे, वैराग पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.टी. मांजरे, डॉ. संजय शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. मालेगाव येथील घोडके व पाटील वस्ती  माळरान परीसरात 3मोर, 3 लांडोर, 1 तीतरं, 1 लाहोर, 1 भारद्वाज, 1 सातभाई, 1 होला अशा अकरा मृत पक्षांचे व वन्यप्राण्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृत पक्षांचे शवविच्छेदन करून नमुने राखून ठेवण्यात आले आहेत. यासाठी वनमजुर भारत पवार, पांडुरंग गुंड, रशिद पठाण, पंचायत समितीचे बापू क्षीरसागर यांनी ही प्रक्रिया राबवली.

यावेळी बार्शीचे प्राणी मित्र प्रतिक तलवाड, वैभव बोथरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून त्यांनी सांगितले की, मालेगाव शिवारात मोर व इतर पक्षी प्राण्यांचा मृत्यू झाला. हा विषबाधेचा प्रकार आहे. या ठिकाणी मका, ज्वारीचे दाणे आढळून आले आहेत. त्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत मोर, लांडोर व पक्षांचे विसेरा राखून ठेवला असून तो पुणे येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे वैरागच्या वनपाल सिमा मगर यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतांचे अवशेस जाळून नष्ट करण्यात आले. पुढील तपास बार्शीवनपरिक्षेत्र अधिकारी शामराव सातपुते हे करीत आहेत.

Web Title: Many birds die in malegaon