हमखास कंबरडे मोडणारे रस्ते 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोल्हापूर - शहरातील खराब रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारावर निश्‍चित करून काही रस्त्यांवर खडी विस्कटल्याचा बनावही आता शहरवासीयांसमोर येत आहे. शहरातील अनेक वर्दळीचे रस्ते आजही खड्डयातच आहेत. सर्वाधिक वाहतूक असणारा टेंबेरोड, राजारामपुरी बसरोड, बागल चौक जयराज पेट्रोल पंप ते शाहू मिल आणि जनता बझार ते बाबूभाई परिख पुलाकडे जाणारा रस्ता आजही खड्डयातच आहे. हमखास कंबरडे मोडणारे हे रस्ते आहेत. त्यामुळे डॉक्‍टरांचे खिसे भरले जात आहेत. 

शहरातील रस्ते करण्यासाठी कोट्यंवधीचा निधी आला. वेगवेगळ्या योजना झाल्या. दहा वर्षे होत आली तरीदेखील एखाद्या योजनेतून मिळालेला निधी पूर्णपणे खर्च होऊन काम होऊ शकले नाही, हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. नगरोत्थान योजनेसारखी योजना पैसे असूनही रखडत गेली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी एक मिशन हातात घेऊन हे रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यानंतर मात्र या योजनेकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. मध्यंतरी रस्त्यांची ओरड सुरू झाल्यानंतर आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शहरातील खराब रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारांवर निश्‍चित केल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीचा बनाव ठेकेदारांनी केला. खराब झालेल्या रस्त्यावर कशीतरी खडी विस्कटली आता काही दिवसांनंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशीच स्थिती आहे. 

टेंबेरोड 
शहरातील बहुतांशी वाहतूक या रस्त्यावरून होते; पण या रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत. मध्यंतरी कॉमर्स कॉलेजसमोरचा रस्ता या परिसरातील नगरसेवकांनी लक्ष घालून करून घेतला होता. त्याच पद्धतीने टेंबरोडचेही काम करण्याची गरज आहे, अशी लोकांची अपेक्षा आहे. 

राजारामपुरी बसरोड 
राजारामपुरी बसरोड नगरोत्थान योजनेत समाविष्ट होता; पण हा रस्ता नेमका केला की नाही, असा संशय निर्माण व्हावा, अशी स्थिती आहे. गर्दीचा हा रस्ता खड्डयांनीच भरला आहे. मोठे खड्डे आहेत. त्यामुळे वारंवार अपघातही होत आहेत. निधी असूनही हा रस्ता का झाला नाही, याची जबाबदारीही निश्‍चित व्हायला हवी. आठव्या आणि नवव्या गल्लीजवळ तर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना त्रास होत आहे. 

खड्डेमय रस्ता 
राजारामपुरी जनता बझार ते बाबूभाई परिख पूल हा रस्तादेखील खड्डयांनीच भरला आहे. या रस्त्याच्या उद्‌घाटनाची चर्चा होईपर्यंत रस्त्याला खड्डे पडलेत. हे खड्डे बुजवायचे कष्टही महापालिकेने घेतले नाहीत. मोठी वर्दळ असूनही खड्डयांनी भरलेला हा रस्ता प्रशासनाला का दिसत नाही. शाहू मिल ते जयराज पेट्रोल पंप या रस्त्याचीही स्थिती अशीच आहे.

Web Title: Many city roads potholes