येरफळ गावात तापाची साथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पाटण : येरफळे गावात तापाची साथ आहे. अनेक दिवसांपासून असलेल्या साथीचे निदान झालेले नाही त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याच गावातील हर्षद शिवाजी भिसे (वय 11 वर्ष) या मुलाला डेंग्यू झाल्याचा संशय आहे. त्याच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होतो. त्याला आज घरी सोडले आहे. 

कराड व पाटण येथील खासगी रूग्णालयात अनेकांवर या साथीमुळे उपचार सुरू आहेत. तापाची साथ आटोक्यात येत नसल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. टायफॉईडची लक्षणे दिसत असल्याने रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यातच हर्षद भिसे कृष्णा रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. ओरोग्य विभागाचे पथक अनेक दिवसांपासून गावात सर्व्हेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणात गावातील तब्बल ९० टक्के घरातील पाण्याच्या भांड्यात डासांच्या आळ्या सापडल्या आहेत. 

साथींचे आजार होऊन नेये यासाठी मे महिन्यात माहितीपत्रके वाटुन जनजागृती  करण्यात आली होती. मात्र, गावातील लोकांनी हे गांभीर्याने न घेतल्यामुळेच घेतली नसल्याने पाण्याच्या भांड्यात आळ्या सापडल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वतः प्रत्येक घरातील पाण्याची भांडी रिकामी करण्याची मोहिम राबवित आहेत. आरोग्य विभाग खबरदारी घेत असला तरी तापाची साथ आटोक्यात आलेली नाही. दररोज १५ ते २० रुग्ण खासगी दवाखान्यात जात असल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. यास ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा व नळयोजनेची टाकी स्वच्छ न करण्याचा हा परिणाम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

Web Title: many people admit in hospital because fever